Breaking News
१४ सप्टेंबर २०२४
१४ वर्ष वयोगट मुलींचा खो खो स्पर्धेमध्ये तालुकास्तरीय प्रथम क्रमांक
अजनाळे: दिनांक 13 सप्टेंबर 2024 रोजी झालेल्या तालुकास्तरीय अंतिम सामन्यामध्ये छत्रपती शिवाजी हायस्कूल वाटंबरे या संघाचा आठ गुणांनी पराभव करून तालुकास्तरीय खो-खो स्पर्धेमध्ये 14 वर्षे वयोगट मुलींनी प्रथम क्रमांक मिळवला या स्पर्धा सांगोला तालुका क्रीडा संकुल या ठिकाणी संपन्न झाल्या या स्पर्धेमध्ये तालुक्यातील विविध स्पर्धकांनी सहभाग घेतला होता अंतिम सामन्यामध्ये छत्रपती शिवाजी हायस्कूल वाटंबरे व विकास विद्यालय अजनाळे या दोन संघांमध्ये सामना झाला या सामन्यामध्ये विकास विद्यालयाचे खेळाडू जरी लहान वाटत असले तरी आक्रमण आणि संरक्षण या दोन कौशल्याचा अतिशय सुंदर युतीने वापर करून प्रतिस्पर्धी संघावर वर्चस्व निर्माण केले या संघातील सर्व मुली जिद्दी आहे आणि जिद्द असेल तर अशक्य ते शक्य करू शकतो हे या खेळाडूंनी दाखवून दिले स्पर्धेच्या सुरुवातीपासूनच प्रतिस्पर्धी संघावर आघाडी घेत अंतिम सामन्यात आठ गुणांनी विजय मिळवला व जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी 14 वर्षे वयोगट मुलींचा संघ पात्र ठरला या संघाल विद्यालयाचे क्रीडाशिक्षक श्री येलपले बीबी सर श्री एस एम कोळवले सर आशिष सर व विद्यालयाचे माजी खो खो खेळाडू राकेश पवार अतुल कोळवले व प्रकाश यलपले यांचे मोलाचे मार्गदर्शन मिळाले या खेळाडूंच्या विजयाबरोबरच संस्थेचे अध्यक्ष श्री प्रल्हाद सोपान येलपले दादा संस्थेचे सचिव श्री विजय प्रल्हाद येलपले विद्यालयाचे माजी प्राचार्य श्री शामराव कोळवले सर तसेच विद्यालयाचे विद्यमान प्राचार्य श्री अशोक यलमार सर शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यालयातील सर्व विद्यार्थ्यांनी अभिनंदन करून पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा