Breaking News

१४ सप्टेंबर २०२४

*राष्ट्रीय प्रजासत्ताक दिन संचलन शिबीरासाठी कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय भिगवण येथील दोन एन. एस. एस. स्वयंसेवकांची निवड”*


 विशेष प्रतिनिधी - संतोष कदम.

 भिगवन :- ( ता. इंदापूर )   सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने  राष्ट्रीय प्रजासत्ताक दिन संचलन शिबिर पूर्व निवड चाचणी करीता जिल्हास्तरीय निवडचाचणी शिबीरा मधून कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय भिगवण ता इंदापूर येथील कु.प्रियंका संतोष चव्हाण आणि स्वप्निल कांतीलाल लोंढे या दोघांची निवड करण्यात आली आहे.


 महाविद्यालयाचे प्रतिनिधी म्हणून २६ जानेवारी (प्रजासत्ताक दिन) २०२५ , राष्ट्रपती भवन परिसर, नवी दिल्ली परेड पूर्व जिल्हा स्तर निवड चाचणी शिबिर, अप्पासाहेब जेधे महाविद्यालय, पुणे येथे सहभागी झालेल्या रासेयो स्वयंसेवकांपैकी (दि. ११/०९/२०२४)  अनुक्रमे - 


१) कु.प्रियंका संतोष चव्हाण-SYBA

२) स्वप्निल कांतीलाल लोंढे - T.Y.B.Sc.

३) वैभव जयंत भोईटे - T.Y.B.Sc.


हे  राष्ट्रीय सेवा योजना स्वयंसेवक आणि स्वयंसेविका सहभागी झाले होते.


यासाठी महाविद्यालय राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे “पुणे ग्रामीण विभागाचे” विभागीय समन्वयक डॉ. अनिल बनसोडे यांनी अथक परिश्रम घेतले आहे.  

कु.प्रियंका संतोष चव्हाण आणि स्वप्निल कांतीलाल लोंढे या दोघांच्या निवडीबद्दल सर्व स्तरातून कौतुक होत असून, इंदापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष मा. हर्षवर्धन पाटील यांनी अभिनंदन केले आहे.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा