अजनाळे गावातील अंगणवाडी सेविका व मदतनीस यांचा मनमानी कारभार सुरु असुन शासनाने दिलेल्या सर्व नियम धाब्यावर बसवुन कामकाज करीत आहेत. पोषण आहार मध्ये मोठ्या प्रमाणात आफरा तफर करुन शाळेमध्ये कमी पट संख्या असुन जास्त पोषण आहार लाटला आहे. शाळेमध्ये विद्यार्थ्यांची उपस्थिती कमी असताना रजिस्टरवर जास्त विद्यार्थी संख्या दाखवून अंगणवाडी सेविका पोषण आहारावर डल्ला मारत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
गावातील अंगणवाडी सेविका व मदतनीस या कोणत्याही अधिकारी कर्मचारी व पर्यवेक्षिका यांना न जुमानता आपला कारभार करत आहेत आपल्या मर्जीप्रमाणे कधीही शाळा भरवणे कधीही शाळा सोडणे असा मनमानी कारभार करत असून पर्यवेक्षिका यांची या अंगणवाडी सेविका व मदतनीस यांच्यावर वचक न राहिल्यामुळे रामभरोसा कारभार सुरू आहे.
तरी झोपेचे सोंग घेतलेल्या महिला बाल विकास प्रकल्प अधिकारी यांनी वेळीच लक्ष घालून अजनाळे गावातील सर्व अंगणवाडी शाळेची खातीनीय चौकशी करून दोषी असणाऱ्या अंगणवाडी सेविका यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी केली जाऊ लागली आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा