Breaking News

डॉ.आंबेडकर स्मारक येथे महात्मा फुले जयंती उत्साहात


 विशेष प्रतिनिधी ‌- संतोष कदम.

बारामती :- दि.१२: येथील भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळा स्मारक येथे बहुजन समाजातील सर्व सुजाण नागरिकांनी एकत्र येऊन क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती उत्साहात साजरी केली. त्याचसोबत उपस्थित मान्यवरांच्या हस्ते डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला आणि महात्मा ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.यावेळी शुभम अहिवळे आणि माजी नगरसेवक प्रा.रमेश मोरे यांनी मनोगत व्यक्त करत उपस्थितींना जयंतीच्या शुभेच्छा दिल्या.


याप्रसंगी,माजी नगरसेवक गणेश सोनवणे,गौतम शिंदे,गजानन गायकवाड,सोमनाथ रणदिवे,विश्वास लोंढे,बंटी गायकवाड,अक्षय माने,किरण भोसले,सोमनाथ लोंढे,रितेश गायकवाड,राहुल काळे, ऋषिकेश जाधव,आर्यन गायकवाड व आदी उपस्थित होते.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत