Breaking News

२६ जानेवारी २०२४

बहुजन समाज पार्टी इंदापूर विधानसभा अध्यक्षपदी मनेश कांबळे यांची नियुक्ती..


 विशेष प्रतिनिधी - संतोष कदम.

लासुर्णे :- ( ता. इंदापूर ) बहुजन समाज पार्टी इंदापूर विधानसभेची बैठक दिनांक 25/ 1/ 2024 रोजी दुपारी 12 वाजता लासुर्णे येथील इंदापूर विधानसभा कार्यालय मध्ये संपन्न झाली. 

या बैठकीला प्रामुख्याने बहुजन समाज पार्टी पुणे जिल्हा अध्यक्ष मा. रमेश जी गायकवाड , प्रभारी शफिक भाई तसेच जिल्हा कोषाध्यक्ष श्रीपती दादा चव्हाण, मा.प्रदेश सचिव अजितजी ठोकळे उपस्थित होते. 

15 जानेवारी हा दिवस बहन कुमारी मायावती जी यांचा वाढदिवस जनकल्याणकारी दिवस म्हणून सर्वत्र साजरा केला जातो . तसेच बहुजन समाज पार्टी या दिवसाला आर्थिक सहयोग दिवस म्हणूनही साजरा करते. बहन कुमारी मायावती जी यांच्या वाढदिवसानिमित्त संपूर्ण महाराष्ट्रामध्ये कार्यकर्त्यांच्या केडर कॅम्पचे आयोजन येत्या 27 /28 तारखेला संपूर्ण 288 विधानसभा मध्ये होत आहे . या केडर कॅम्प बद्दल माहिती सांगण्यासाठी आणि आर्थिक सहयोग कार्यकर्त्यांनी करण्यासाठी या मिटींगचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रमुख पाहुण्यांनी आपले मनोगत व्यक्त केले.तसेच मीटिंगमध्ये विधानसभा प्रभारी म्हणून प्रदीप जी साबळे व विधानसभा अध्यक्ष म्हणून मनेश कांबळे यांची नियुक्ती करण्यात आली. तसेच काही सेक्टर अध्यक्षांच्याही निवडी या मीटिंगमध्ये करण्यात आल्या. अंथूर्णे सेक्टर अध्यक्ष ची जबाबदारी श्रेयश शिवशरण  यांच्याकडे देण्यात आली. उर्वरित कार्यकारणी  होणाऱ्या कॅडर कॅम्प नंतर नियुक्त करण्यात येईल असे मत जिल्हाध्यक्ष रमेश गायकवाड यांनी व्यक्त केले.

 या कार्यक्रमाला मा. आनंद फडतरे, सुमित मिसाळ, सचिन वाघमोडे, विकास लोधाडे, महादेव कारंडे, आत्माराम सोनवणे, नाना जाधव, यश चितारे, किशोर गायकवाड, अतुल चतुर, दत्तात्रय आवळे, दीपक पवार, महेंद्र खरात, कुणाल सोनवणे, किरण सोनवणे आदी  कार्यकर्ते उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा