अजनाळे येथे एका महिन्यापासुन पशुवैद्यकीय पद रिक्त; तात्काळ पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांची नियुक्ती करावी पशुपालकांची मागणी...
![]() |
अजनाळे:सचिन धांडोरे:
*येथिल पशुवैद्यकीय दवाखाना गेल्या एका महिन्यापासून येथील पशुवैद्यकीय अधिकारी पद रिक्त असल्यामुळे पशुपालकांना खाजगी डॉक्टर कडे धाव घ्यावी लागत आहे.अजनाळे गावातील शेतकऱ्यांचा शेती हा मुख्य व्यसाय आहे जोडव्यवसाय म्हणुन शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात पशुपालन हा व्यवसाय आहे. तालुका पशुवैद्यकीय अधिकारी यांनी वेळीच लक्ष घालून एका महिन्यापासून रिक्त असलेल्या अजनाळे पशुवैद्यकीय केंद्रात तात्काळ पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांची नियुक्ती करावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते सुदर्शन वाघमारे यांनी केली आहे*.
डॉ गोतसूर्य यांची बदली होऊन जवळपास एक महिन्याचा कालावधी गेला तरी अद्याप पर्यंत अजनाळे गावाला कायमस्वरूपी पशुवैद्यकीय अधिकारी न मिळाल्यामुळे पशुपालक शेतकऱ्यांमधून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. शेतकऱ्यांना पशुधन वाचवण्यासाठी खाजगी डॉक्टरांकडे जाऊन उपचार करावे लागत आहे. दुभत्या जनावरांना उपचार करणयासाठी पशुवैद्यकीय अधिकारीच उपलब्ध नसल्यामुळे शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात कुचबंना होत असल्याने पशुवैद्यकीय दवाखान्याला कोणी वाली आहे का? असा संतप्त सवाल शेतकरी वर्गाकडून केला जात आहे.तरी शेतकऱ्यांचा अंत न बघता तात्काळ पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांची नियुक्ती करावी अशी मागणी शेतकरी पशुपालक वर्गामधून केले जात आहे.
*शासनाकडून लाखो रुपये खर्चून जनावरांना चांगल्या प्रकारे मोफत उपचार गावातच व्हावा या उद्देशाने औषध गोळ्या,सलाईन,लसिकरण दिले जाते परंतु हे जनावरांवर उपचार न करता परस्पर औषध विक्री करत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. संबंधित विभागाने वेळीच लक्ष घालुन योग्य ती चौकशी करावी अशी मागणी पशुपालक शेतकरी वर्गाकडून केली जात आहे*.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत