विद्रोही कवी दत्तात्रय भोसले यांची " साहित्य गौरव पुरस्कार २०२३ " करीता निवड ....
विशेष प्रतिनिधी - संतोष कदम.
वालचंदनगर :- ( ता. इंदापूर ) वालचंदनगर येथील विद्रोही कवी, दत्तात्रय सुरेश भोसले यांची " साहित्य गौरव पुरस्कार २०२३" करीता निवड झाल्याचे निवडपत्र संमेलन कार्याध्यक्ष रानकवी जगदीप वनशिव संस्थापक अध्यक्ष विजय गायकवाड यांनी दत्तात्रय भोसले यांना दिले आहे.
इंदापूर तालुक्यातील अंथुर्णे येथील संत तुकाराम महाराज पालखी तळ या ठिकाणीं रविवार दिनांक २० ऑगस्ट २०२३ रोजी
कै . भगवानराव भरणे प्रतिष्ठान व
मराठी साहित्य संस्कृती कला विकास परिषद आयोजित सातवे संत तुकाराम महाराज मराठी ग्रामीण साहित्य संमेलन आयोजित करण्यात आले आहे.
यावेळी साहित्य, नाट्य चित्रपट, कला,पत्रकारिता,सामाजिक शैक्षणिक कार्यात आपला वेगळा ठसा उमटवणाऱ्या मान्यवरांना साहित्य संमेलनात मान्यवरांचे हस्ते पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे. एक दिवसीय साहित्य संमेलनात उद्घाटक आमदार दत्ता मामा भरणे( माजी पालकमंत्री सोलापूर),प्रमुख पाहुणे मेघराज राजे भोसले,(अध्यक्ष अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ),ज्येष्ठ कविवर्य
,वसंतराव पाटील (जलदगती हायकोर्ट माझगाव न्यायाधिश),श्रीमंत आकळे साहेब (सहाय्यक पोलीस आयुक्त परिवहन विभाग,पुणे),सिने अभिनेता बाबा गायकवाड
,प्रा.डा.संदीप सांगळे(सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ मराठी अभ्यास मंडळ अध्यक्ष)
संमेलनाचे अध्यक्ष लोककवी सिताराम नरके( माजी पोलीस अधिकारी राष्ट्रपती पोलीस पदक मानकरी),बाळासाहेब गिरी (गझलकार),अशोक जाधव(माजी जिल्हा आधिकारी),लक्ष्मण शिंदे (वनविभाग मुख्यालय लेखापाल पुणे) ,जयश्री सोनवणे(उद्घाटन सोहळा,वृत्तनिवेदिका),संस्थापक अध्यक्ष विजय गायकवाड व संमेलनाचे कार्याध्यक्ष निवेदकरानकवी,जगदीप वनशिव आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
विद्रोही कवी दत्तात्रय भोसले यांची " साहित्य गौरव पुरस्कार 2023 " निवड झाली असल्याने समाजाच्या विविध स्तरातून त्यांचेवर अभिनंदन व शुभेच्छांचा वर्षाव होत आहे .

कोणत्याही टिप्पण्या नाहीत