महात्मा फुले कॉलनी येथे अंथुर्णे गावचे सरपंच प्रवीण साबळे व श्री वर्धमान विद्यालयाचे माजी प्राचार्य चंद्रकांत कांबळे सर यांचा नागरिक सत्कार संपन्न....
विशेष प्रतिनिधी - संतोष कदम.
अंथुर्णे :- ( ता. इंदापूर ) अंथुर्णे गावचे सरपंच पदी नुकतीच प्रवीण लक्ष्मण साबळे यांची निवड झाली आहे. त्याचबरोबर महात्मा फुले कॉलनी वरील सुपुत्र व श्री वर्धमान विद्यालयाचे माजी प्राचार्य चंद्रकांत मारुती कांबळे सर हे नुकतेच सेवानिवृत्त झाले आहेत. त्याबद्दल रमामाता कॉलनी व महात्मा फुले कॉलनी ( उखळमाळ ) वरील नागरिकांच्या वतीने राजगृह बुद्ध विहार येथे सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता.
यावेळी सर्वप्रथम दोन्ही प्रमुख सत्कार मूर्ती यांच्या हस्ते बुद्ध मूर्तीची पूजा करून सामूहिक त्रिशरण पंचशील ग्रहण केले.
प्रसंगी महात्मा फुले कॉलनी वरील ज्येष्ठ नागरिक उत्तम धिमधिमे व रमामाता कॉलनी वरील जयंती उत्सव मंडळाचे अध्यक्ष हनुमंत वाघमारे यांच्या हस्ते नवनियुक्त युवा सरपंच प्रवीण लक्ष्मण साबळे व श्री वर्धमान विद्यालयाचे माजी प्राचार्य चंद्रकांत मारुती कांबळे सर यांचा शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी दोन्ही कॉलनी वरील नागरिकांनी नवनियुक्त सरपंचा पुढे आपल्या मूलभूत समस्या मांडल्या, त्यावेळी समस्या जाणून घेत शक्य तितक्या पूर्णपणे सोडवण्याचा सरपंच या नात्याने त्यांनी आश्वासन शब्द दिला.
यावेळी कांबळे सर यांनी आपले मनोगत व्यक्त करताना ते म्हणाले, माझा जन्म, जडणघडण, शिक्षण याच कॉलनी वरती झाले. श्री वर्धमान विद्यालयांमध्ये प्राचार्य पदी संधी मिळाली ती केवळ याच कॉलनी वरील आपल्या सर्वांच्या आर्शिवादामुळेच असे मी मानतो. पुढे ते म्हणाले, विद्यार्थी हा शिक्षणापासून भरकटत चाललेला आहे. मोबाईल मुळे विद्यार्थी हा अधोगतीकडे चाललेला आहे. विद्यार्थ्यांनी शिक्षणाकडे लक्ष देऊन आपली आर्थिक प्रगती साधावी असा मौलिक सल्ला त्यांनी यावेळी दिला.
यावेळी माजी सरपंच बाळू वाघ, माजी उपसरपंच संजय वंचाळे, ग्रा.पं. सदस्य किशोर रणमोडे, ग्रा.पं. सदस्य रेणुका कांबळे, सामाजिक कार्यकर्ते संतोष कांबळे व शेखर काटे, ॲड . संजय चंदनशिवे, दिलीप लोंढे सर, शिवाजी साबळे, सोनू साबळे, संजय धिमधिमे, अतुल बनसोडे,अण्णा तोरणे, अण्णा ओव्हाळ , सुरेश मोटे, राजू भोसले, मनोज रणदिवे, सागर काटे, लक्ष्मी वंचाळे, सुनिता खरात, मंगल कदम, कमल गवळी, कुसुम अहिवळे, वंदना तोरणे , रेखा केंगार, यांच्यासह युवा वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार सुनील केंगार यांनी केले .


कोणत्याही टिप्पण्या नाहीत