साहिरत्न लोकशाहिर आण्णाभाऊ साठे यांची जयंती दिनी सामाजिक उपक्रम राबवत बसपाच्या वतीने साजरी...
विशेष प्रतिनिधी - संतोष कदम.
फलटण :- लोकशाहीर अण्णा भाऊ साठे जयंती दिनी बसपाच्या वतीने सामाजिक उपक्रम राबवत एक आगळी वेगळी जयंती साजरी करण्यात आली.
यावेळी फलटण तालुक्यातील ग्रामीण भागातील शेतकरी कुटुंबाना शेतातील पिकाचे झालेल्या नुकसानभरपाई साठी शासनाने भरपाई मिळवण्यासाठी जो पिक विमा निश्चित केलाय त्याचे Form भरुन देण्यासाठी बसपा फलटण विधानसभेची बुथ सेक्टर शहर च्या पदाधिकारी कार्यकर्ते यांच्या पुढाकाराने स्वतः शेतकरी यांना माहिती देवुन त्यांची लागणारी कागदपञे जमा करुन राञिचा दिवस करुन स्वतः बसुन online केली .
त्यासाठी फलटण तालुक्याचे युवा नेञुत्व प्रदिप उर्फ प्रेम सुरेश मोरे तसेच फलटण विधानसभा प्रभारी तथा सातारा जिल्हा सचिव मा.प्रविण विटकर फलटण विधानसभा अध्यक्ष मा.दिनेश कांबळे, फलटण शहर अध्यक्ष मा.सुहास काकडे तसेच विधानसभा महासचिव- प्रकाश गिरी,किरण हॊसारे, संदिप सोणवणे,सर्वेश मोरे,बाळक्रुष्ण शिंदे ,सागर आढाव ,प्रणित सावंत,महिला टिम ,प्रियंका सावंत,भोसले मॆडम,रोहिणीताई फाळके ,यांच्या समवेत सातारा जिल्हा अध्यक्ष मा.मंगेश मोरे साहेब व सातारा जिल्हा प्रभारी मा.उदय काकडे साहेब यांच्या नियोजनाद्वारे शेतकरी पिक विमा १०३ लोकांची कागदपत्रे ७/१२ जुळवून आज च्या जयंती निमित्ताने बसपा कडुन अगदी तन मन धनाने भरण्यासाठी सहकार्य केले . व अजूनही भरणे चालू आहे . त्याचप्रमाणे सर्व शासकीय योजना प्रत्येक कुटुंबातील सदस्य पर्यंत पोहचवुन मिळविण्यासाठी बसपा टिम सक्रिय आहे असते.
तसेच निराधार, अपंग,बालकल्याण, महिलां साठी पिठाची चक्की,सायकल,रमाई घरकुल ,इतर घरकुल योजना व शेतीविषयक योजना, बांधकाम कामगार योजना,मिळविण्यासाठी अगदी बसपा टिम लोकांच्या हितासाठी निस्वार्थी रुपाने कार्यकरत आहे.
महापुरूषांना अभिवादन तसेच बसपा चा जाहीरनामा च भारतीय संविधान असल्याने याच मार्गाने आपले हक्क अधिकार मिळवत असतो याचा जनतेला देशवाशियांना लाभ प्रसार करत असतो. असे प्रेम मोरे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत