Breaking News

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त साद फाउंडेशन इंदापूर यांच्या वतीने शालेय साहित्य वाटप...


 विशेष प्रतिनिधी - संतोष कदम.

  वालचंदनगर :- ( ता. इंदापूर ) साहित्यरत्न, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निमित्त आज मंगळवार  दि.१ ऑगस्ट २०२३ रोजी   राजदत्त उबाळे अनुसूचित जाती केंद्रीय प्राथमिक निवासी शाळा वालचंदनगर येथे साद फाऊंडेशन इंदापूर या सेवाभावी संस्थेच्या (चॅरिटेबल ट्रस्टच्या) वतीने वालचंदनगर पोलीस स्टेशन चे सहाय्यक पोलीस निरीक्षक विक्रम साळुंखे सर यांच्या हस्ते शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले.

               साहित्यरत्न , लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निमित्त शिक्षणाचा जागर यानिमित्त केला.

 यावेळी साद फाऊंडेशन चे संस्थापक अध्यक्ष सुरजभैय्या वनसाळे यांनी प्रास्ताविक केले तर वालचंदनगर पोलीस स्टेशन चे सहाय्यक पोलीस निरीक्षक विक्रम साळुंखे सर यांनी प्रमुख मार्गदर्शन केले. व साद फाऊंडेशन च्या या उपक्रमाचे कौतुक केले. तत्पूर्वी मुलांनी सुंदर असा परिपाठ सादर केला.

             यावेळी साद फाऊंडेशन चे संचालक आप्पासो कदम, नागेश भोसले,सौ. कोमल वनसाळे,अजय फले, अनिल केंगार, क्षितीज वनसाळे, विशाल सोनवणे, सौ.अनिता कांबळे, अक्षय फले तसेच शाळेचे मुख्याध्यापक सौ. सविता उबाळे, सहशिक्षिका सौ. सोनवणे, इतर शिक्षक व शिक्षकेत्तर स्टाफ, शाळा व्यवस्थापन समितीचे सर्जेराव उबाळे, अभिजित उबाळे तसेच रोहीत सोनवणे, भोला गायकवाड,रवि लोंढे,  प्रथमेश खरात, प्रमोद कांबळे हे उपस्थित होते.

             या कार्यक्रमाचे सुत्रसंचलान तसेच उत्कृष्ट नियोजन शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष मा.अनिल उबाळे सर यांनी केले, त्याचबरोबर शाळेविषयी माहिती, मुलांची प्रगती याविषयी सर्वांना त्यांनी ज्ञात केले.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत