उदनवाडी येथील अशोक आलदर यांनी महात्मा फुले सार्वजनिक वाचनालय ७ हजार रुपये किमतीची विविध पुस्तके भेट.....
सांगोला गौरव न्यूज नेटवर्क:
महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण महामंडळात कार्यरत असणारे उदनवाडी गावचे सुपुत्र 🌷आदरणीय अशोक सुऱ्याबा आलदर साहेब🌷 यांनी रविवार दिनांक 23 जुलै,2023 रोजी सायंकाळी 7 वाजता उदनवाडीतील महात्मा फुले सार्वजनिक वाचनालयास सहकुटुंब भेट दिली. या भेटी प्रसंगी त्यांनी वाचनालयास🌹 सात हजार रुपये 🌹किमतीची विविध विषयांवरील अत्यंत मौलिक अशी ग्रंथसंपदा भेट दिली. वाचनालयाचे अध्यक्ष आदरणीय मा.प्राचार्य विठ्ठल वलेकर सर यांनी ही ग्रंथसंपदा नम्रपणे स्वीकारली. यावेळी माननीय अशोक आलदर साहेब, त्यांच्या सुविद्य पत्नी सौ वसुधा अशोक आलदर, मुलगा ओंकार अशोक आलदर, कन्या सानिका अशोक आलदर, कवी प्रा. मुकुंद वलेकर हे उपस्थित होते.
यावेळी महात्मा फुले सार्वजनिक वाचनालयाची 🌷ज्ञानप्रभा 🌷ही रौप्य महोत्सवी स्मरणिका प्राचार्य विठ्ठल वलेकर सरांच्या वतीने मा.अशोक आलदर साहेबांना देण्यात आली. मा. अशोक आलदर साहेब हे अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतून शिक्षण घेऊन नोकरीस लागले. नोकरी करताना अत्यंत उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल त्यांना महाराष्ट्र शासन कामगार विभागाचा गुणवंत कर्मचारी पुरस्कार
(मेडल , ट्राफी, पंचवीस हजार रूपये ) तसेच महाराष्ट्र राज्यातील अनेक मान्यवर संस्थांनी अनेक पुरस्कार देऊन गौरविले आहे,याचा आम्हा समस्थ उदनवाडीकरांना सार्थ आनंद व अभिमान वाटतो.सेवाभावी वृत्तीचे आणि उदनवाडी गावावर मनस्वी प्रेम असणारे अशोक आलदर साहेब यांनी उदनवाडी गावासह पंचक्रोशीतील मुलांचा शैक्षणिक व बौद्धिक विकास व्हावा या हेतूने सात हजार रुपये किमतीची ही ग्रंथसंपदा मोठ्या मनाने महात्मा फुले सार्वजनिक वाचनालय , उदनवाडीला प्रदान केली आहे . उदनवाडी गावाच्या नावलौकिकात सतत भर टाकण्यासाठी अशोक आलदर साहेब सतत धडपड करीत असतात. त्यांची दोन्ही मुले कायद्याचे (वकिलीचे )उच्च शिक्षण पुणे येथे घेत आहेत.
विद्यार्थी, वाचक आणि महात्मा फुले सार्वजनिक वाचनालय,उदनवाडी मा. अशोक आलदर साहेबांना मनस्वी धन्यवाद देत आहेत.
- मा. प्राचार्य विठ्ठल वलेकर
अध्यक्ष, महात्मा फुले सार्वजनिक वाचनालय,उदनवाडी यांच्या वतीने
शब्दांकन -
प्रा. मुकुंद वलेकर, उदनवाडी ✒️🙏🙏

कोणत्याही टिप्पण्या नाहीत