अजित दादा युथ फाउंडेशन च्या वतीने सना अळंद हिचा सत्कार संपन्न...
विशेष प्रतिनिधी - संतोष कदम.
बारामती :- दि. 21/ 7 /2023 रोजी बारामती येथे अजित दादा पवार ( उपमुख्यमंत्री महा. राज्य ) यांच्या वाढदिवसानिमित्त अजित दादा युथ फाऊंडेशनच्या वतीने भव्य रक्तदान शिबिर व सामाजिक उपक्रमाबरोबर गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष मा.सौ. शर्मिला पवार ( अध्यक्षा शरयु फाउंडेशन ) , तर प्रमुख पाहुणे म्हणून मा. प्राजक्ता गायकवाड ( सुप्रसिद्ध अभिनेत्री ), मा . विठ्ठल ( नाना ) काटे ( मा. विरोधी पक्ष नेता, नगरसेवक पिं .चिं. मनपा ) व त्याचबरोबर युथ फाऊंडेशनचे सर्व पदाधिकारी , कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी सना अयुब अळंद हिचा शर्मिला पवार व अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड यांच्या हस्ते शाल, सन्मानपत्र, वृक्षरोप देऊन सत्कार करण्यात आला.
सना अळंद हीने MBA प्रवेशासाठी घेतल्या जाणाऱ्या CMAT ( common management admission test ) परीक्षेत देशात 91 वा क्रमांक मिळवला आहे. CMAT ही देशपातळीवर नामांकित व्यवसायिक प्रशिक्षण केंद्रात MBA ला प्रवेश मिळवण्यासाठी परीक्षा घेतली जाते .
सना अळंद ही मुळ वालचंदनगर ची असून तिचे आई वडील फळांचा व्यवसाय करतात. एका फळ विक्रेत्याच्या मुलीने मिळवलेल्या यशा बद्दल सना व तीच्या आई वडिलांचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत