Breaking News

२१ जून २०२३

श्री वर्धमान विद्यालयाच्या सौ अंबिका यांचा इंटरनॅशनल बुक ऑफ रेकॉर्डमध्ये विक्रम...


 प्रतिनिधी - संतोष कदम.

  वालचंदनगर :- ( ता. इंदापूर  ) वालचंदनगर मधील श्री वर्धमान विद्यालय ही एक आदर्श शाळा असून या विद्यालयातील विद्यार्थी नेहमीच स्कॉलरशिप एमटीएस, एनटीएस, एन. एम. एम. एस ,भूगोल प्रज्ञाशोध परीक्षेत अव्वल स्थानी असतात याच विद्यालयाच्या कनिष्ठ महाविद्यालयातील रसायनशास्त्र विभागाच्या प्राध्यापिका सौ अरुंधती अंबिके यांनी विविध विज्ञान प्रदर्शनात सातत्यपूर्ण सहभाग आणि मेरिट अवॉर्ड मिळवून जागतिक स्तरावर विक्रम केला आहे. सौ अंबिके यांना इंटरनॅशनल बुक ऑफ रेकॉर्ड तर्फे प्रमाणपत्र पदक की -चेन देऊन गौरवण्यात आले आहे. या त्यांच्या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष मकरंद वाघ, उपाध्यक्ष महामुनी विद्यालयाचे प्राचार्य हनुमंत कुंभार, उपप्राचार्य अरुण निकम व सर्व सहकाऱ्यांनी अभिनंदन केले.या यशाबद्दल विद्यालयाचे व सौ अंबिके यांचे परिसरात कौतुक होत आहे. उपप्राचार्य अरुण निकम यांनी कौतुक करताना सौ अंबिके यांच्या जिद्द, चिकाटी, मेहनत व अभ्यासू वृत्तीचे फलित असल्याचे सांगितले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा