Breaking News

०३ जून २०२३

श्री वर्धमान विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय वालचंदनगर दहावीचा निकाल 98.96 टक्के


 प्रतिनिधी - संतोष कदम.

 वालचंदनगर :- ( ता. इंदापूर ) दहावी परीक्षेचा ऑनलाईन निकाल दिनांक 2 जून 2023 रोजी दुपारी 1 वाजता जाहीर झाला. वालचंदनगर इंडस्ट्रीज लिमिटेड संचलित, श्री वर्धमान विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय वालचंदनगर या विद्यालयाचा निकाल 98.96 टक्के लागला. यावेळी विद्यालयात 95 टक्के गुण प्राप्त करून त्रिशला कैलास माने प्रथम क्रमांक, खदिजा लियाकत शेख 94% गुण मिळवून द्वितीय क्रमांक तर अभिराज रंगनाथ रंगवाळ 91.80% गुण मिळवून तृतीय क्रमांक प्राप्त करून अभूतपूर्व यश संपादन केले. यावर्षी परीक्षेला एकूण 194 विद्यार्थी बसले होते पैकी 192 विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून फक्त 2 विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले. एसएससी बोर्ड परीक्षेत विशेष प्राविण्य 53 विद्यार्थी, प्रथम श्रेणी 92 विद्यार्थी, द्वितीय श्रेणी 36 विद्यार्थी व तृतीय श्रेणी 11 विद्यार्थी यांनी गुण संपादन करून यशस्वी झाले.


यशस्वी विद्यार्थ्यांचे शाळा समिती अध्यक्ष मकरंद वाघ, उपाध्यक्ष प्रशांत महामुनी, प्राचार्य हनुमंत कुंभार, उपप्राचार्य अरुण निकम, पर्यवेक्षक काशिनाथ हिरवे, सर्व शिक्षकवृंद, शिक्षकेतर कर्मचारी व पालक यांनी अभिनंदन केले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा