Breaking News

विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त आजनाळे येथे उद्यापासून विविध कार्यक्रमांचे आयोजन......


 अजनाळे: सचिन धांडोरे : महामानव, विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३२ व्या जयंती निमित्त अजनाळे  ता सांगोला येथे आजपासुन विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव मंडळ यांनी दिली.

 शुक्रवार दि २८ एप्रिल रोजी सकाळी ८ वा महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन व  पुष्पहार अर्पण साय ८ वाजता गायण पार्टी (भिमगिते) आटपाडी,  यांचा बहारदार गाण्याचा कार्यक्रम होणार आहे.२९ एप्रिल रोजी सकाळी ९ वाजता संगित खुर्ची,साय ४ वाजता महिलांसाठी विविध कार्यक्रम त्यानंतर सायंकाळी ७ वाजता प्रसिद्ध विचारवंत प्रा. सुकूमार कांबळे यांचे व्याख्यान होणार आहे.  दि ३० एप्रिल रोजी सकाळी ११ वाजता स्नेहभोजन, त्यानंतर सायंकाळी ५ वाजता महामानव विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे भव्य दिव्य अशी मिरवणूक निघणार आहे तरी या  सर्व कार्यक्रमांसाठी मोठ्या संख्येने हजर राहावे असे अहवान डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव मंडळ अजनाळे यांनी केले आहे...

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत