Breaking News

२१ फेब्रुवारी २०२३

साप्ताहिक रयतेचा भीम प्रहार हा गोरगरिबांचा कना असून तो समाजातील महत्त्वाचा दुवा आहे.....! साप्ताहिक रयतेचा भीम प्रहार द्वितीय वर्धापनदिनी मा राज्यमंत्री तथा आमदार दत्ता मामा भरणे यांचे गौरवोद्वार.


 प्रतिनिधी - संतोष कदम.

वालचंदनगर:- ( ता. इंदापूर ) दिनांक 19/ 02/ 2023 रोजी साप्ताहिक रयतेचा भीमप्रहार याचे द्वितीय वर्धापनदिन प्रमुख मान्यवरांचा उपस्थितीत उत्साहात संपन्न झाला. यावेळी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधून आपल्या पेपरचा वर्धापन दिन साजरा करणारे संपादक भीमसेन उबाळे हे खऱ्या अर्थाने शिवछत्रपतींचे कार्य विधायक कामातून लोकांपर्यंत पोहोचवताना दिसतात अशा शब्द सुमनांनी उपस्थितांनी वर्धापन दिन कार्यक्रमात कौतुकाची थाप दिली. साप्ताहिक रयतेचा भीमप्रहार चा द्वितीय वर्धापनदिन कार्यक्रमाची सुरुवात इंदापूर तालुक्याचे कार्यक्षम मा.राज्यमंत्री तथा आमदार श्री दत्तामामा भरणे व उपस्थित प्रमुख मान्यवरांच्या हस्ते शिवछत्रपती शिवाजी महाराज, शाहू महाराज, महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, तसेच वीरयोद्धामाता सावित्रीमाई उबाळे, लोकनायक राजदत्त उर्फ आबासाहेब उबाळे यांच्या प्रतिमांचे पूजन करून व दीप प्रज्वलन करून करण्यात आली.

याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान मा.राज्यमंत्री तथा आमदार दत्तामामा भरणे यांना देण्यात आले यावेळी आपल्या प्रास्ताविकपर मनोगतामध्ये 19 फेब्रुवारी शिवजयंती या दिवशीच वर्धापनदिन घेण्याचे कारण मुख्य संपादक भीमसेन उबाळे यांनी विस्तृतपणे उपस्थितांसमोर विशद केले कार्यक्रमाच्या  मध्यंतरी उपस्थित मान्यवरांच्या शुभहस्ते विविध जिल्ह्यातील आलेले पत्रकार संपादक व सामाजिक कार्यकर्ते यांचा साप्ताहिक रयतेचा भीमप्रहार परिवारा वतीने '' समाज 

न्याययोद्धा '' हा विशेष पुरस्कार व सन्मानपत्र देऊन यथोचित सन्मानित करण्यात आले तसेच याप्रसंगी 'उत्कृष्ट महिला सरपंच,2023' हा विशेष पुरस्कार  कळंब गावच्या सरपंच सौ विद्या अतुल सावंत यांना तर 'उत्कृष्ट सामाजिक संस्था 2023' हा विशेष पुरस्कार कै.भगवानराव भरणे प्रतिष्ठान यांना कार्यक्षम आमदार दत्तामामा भरणे यांच्या हस्ते देऊन यांच्या निस्वार्थ कार्याचा पुरस्कार देऊन सन्मानपूर्वक आदर करण्यात आला.आमदार दत्तामामा भरणे यांनी दिला दिवंगत मित्र अपक्ष पंचायत समिती सदस्य  लोकनायक राजदत्त उबाळे यांच्या आठवणींना उजाळा, तसेच या सुंदर अशा कार्यक्रमाप्रसंगी माळशिरस तालुक्यातील धडाडीचे पत्रकार श्री प्रमोद शिंदे, पत्रकार संरक्षण समितीचे इंदापूर तालुक्याचे अध्यक्ष डॉक्टर सिद्धार्थ सरवदे, सासवड येथील वृत्तपत्राचे संपादक श्री पंकजदादा धिवार, ज्येष्ठ पत्रकार गोकुळबापू 

टांकसाळे, यांनी आपल्या मनोगत मध्ये राजे शिवछत्रपतींच्या जयंतीचे औचित्य साधून साप्ताहिक रयतेचा भीमप्रहार परिवाराने घेतलेल्या द्वितीय वर्धापन दिन कार्यक्रमाचे विशेष कौतुक करून आजच्या विविधांगी  पत्रकारितेचे समाजातील प्रत्येक घटकाशी असलेले नाते व त्याच्यातून निर्माण होणारे समाज हिताच्या बाजूंचे महत्त्व विस्तृतपणे विशद केले. या वर्धापनदिन कार्यक्रमास आपल्या व्यस्त आशा दिनचर्येतून इतरही प्रमुख मान्यवरांसह वालचंदनगर कंपनीचे ऍडमिनिस्ट्रेशन मॅनेजर श्री मच्छिंद्र शिरसाठ साहेब यांनीही उपस्थित राहून आपल्या मनोगतामध्ये साप्ताहिक रयतेचा भीमप्रहारच्या कार्याचे कौतुक करून त्यांची अशीच उत्तरोत्तर प्रगती होत राहो अशी इच्छा व्यक्त करून त्यांच्या संपूर्ण टीमला पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा दिल्या यावेळी उपस्थित सर्व मान्यवर पत्रकार व सामाजिक कार्यकर्त्यांसह जेष्ठ पत्रकार गोकुळ टांकसाळे, पंकज दादा धिवार, प्रमोद शिंदे, संतोष दहिदुले, अमोल राजपूत, समाधान राजपूत, डॉक्टर सिद्धार्थ सरवदे, निलेश जाधव, संतोष कदम, स्वप्निल कांबळे,पोलिस मित्र संघटनेचे पदाधिकारी दिपक खाडे त्याचबरोबर सामाजिक कार्यकर्ते तुषार शिवपूजे, सुदाम जाधव, सरपंच नितीन सोनवणे, नवनाथ चितळकर, दादा पठाण, यांचा ''समाज न्याय योद्धा हा 2023" चा विशेष पुरस्कार उपस्थित मान्यवरांच्या हस्ते देऊन विशेष गौरव करण्यात आला. तसेच मान्यवरांच्या हस्ते वीशेषांक प्रकाशित करण्यात आला. या कार्यक्रमासाठी माजी तंटामुक्ती अध्यक्ष व ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते सर्जेराव उबाळे, पुणे जिल्हा नियोजन समितीचे माजी सदस्य सचिन सपकाळ, सुनील केंगार, आप्पा धीमधिमे, सागर जाधव, दत्ता भोसले, हर्षवर्धन उबाळे, महेश पवार, सुरज घोडके, अक्षय वाघमारे, दीपक वाघमारे, शिरीष कांबळे, दादा पठाण, शरीफ काळे, शहाजान पत्तेवाले यांच्यासह पंचक्रोशीतील ग्रामस्थ व निमंत्रित मान्यवर उपस्थित होते वर्धापन दिन कार्यक्रमाचे नियोजनबद्ध सूत्रसंचालन प्रसिद्ध निवेदक निलेश धापटे यांनी केले असून मान्यवरांचे आभार प्रतिनिधी पवार सर व इतर प्रतिनिधींनी मांडले हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी अनेक ज्ञात अज्ञात लोकांचे सहकार्य झाले असून कार्यक्रमाची सांगता स्वादिष्ट अशा स्नेहभोजनाने झाली.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा