Breaking News

२४ जानेवारी २०२३

पायोनियरची वाघीण प्रतिक्षा येलपले पुणे विभागीय गोळा फेक स्पर्धेत प्रथम...


अजनाळे :सचिन धांडोरे:  दिनांक 23 जानेवारी. पंढरपूर येथे झालेल्या पुणे विभागीय गोळा फेक स्पर्धेमध्ये 17 वर्षाखालील गटांमध्ये पायोनियर इंग्लिश मीडियम स्कूल & पायोनियर सेमी इंग्लिश स्कूलची कु. प्रतीक्षा दत्तात्रय येलपले या विद्यार्थिनीने प्रथम क्रमांक पटकाविला. पुणे विभागाच्या विविध जिल्ह्यातून आलेल्या स्पर्धकांमधून सोलापूर जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करणाऱ्या प्रतीक्षाने पुणे विभागात प्रथम क्रमांक मिळविला. प्रतीक्षाने १०.३७मी. गोळा फेकून हे यश आपल्या बाजूने खेचून घेतले. पुणे विभागात मिळवलेल्या प्रथम क्रमांकामुळे प्रतीक्षा राज्यस्तरीय मैदानी स्पर्धेत गोळाफेक मध्ये विभागाचे नेतृत्व करणार आहे. तिच्या यशाबद्दल पायोनियर संकुलाचे संस्थापक अध्यक्ष श्री. अनिल येलपले व य. मंगेवाडी गावचे सर्व आजी माजी सरपंच, प्रतिष्ठित नागरिक व सर्व ग्रामस्थ यांनी प्रतीक्षेच्या अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. प्रतीक्षाच्या याच्यामध्ये तिचे पालक श्री. दत्तात्रेय येलपले यांचे अनमोल असे मार्गदर्शन लाभले. त्याचबरोबर संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री. अनिल येलपले, क्रीडा शिक्षक श्री. घाडगे सर व सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे अनमोल मार्गदर्शन लाभले. सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी प्रतीक्षाचे अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.


*प्रशालेमध्ये प्रतीक्षा च्या सत्कार समारंभावेळी ढोल व लेझीमच्या गजरात तिचे स्वागत मंगेवाडी पाटी ते शाळेच्या मैदानापर्यंत करण्यात आले व प्रतिष्ठित मान्यवरांच्या हस्ते प्रतीक्षाचा सत्कार समारंभ पार पडला. या यशाबद्दल प्रतीक्षा वरती पुणे विभागातून अभिनंदन याचा वर्षाव होत आहे*


.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा