डॉ बाबासाहेब देशमुख यांची रयत शिक्षण संस्था साताराच्या जनरल बॉडीच्या सदस्य पदी निवड..
अजनाळे:सचिन धांडोरे: पुरोगामी युवक संघटनेचे प्रदेशाध्यक्ष शेतकरी कामगार पक्षाचे युवक नेते डॉ बाबासाहेब देशमुख यांची रयत शिक्षण संस्था साताराच्या जनरल बॉडी च्या सदस्य पदी निवड करण्यात आली आहे. पद्मभूषण डॉ कर्मवीर भाऊराव पाटील यांनी महाराष्ट्राच्या बहुजन समाजातील गरीब आणि होतकरू विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचे व्यवस्था व्हावी म्हणून सन १९१९ रयत शिक्षण संस्थेची स्थापना केली. आज महाराष्ट्राच्या 15 आणि कर्नाटक राज्याच्या एक अशा एकूण 16 जिल्ह्यात शिक्षणाचा विस्तार झाला आहे.अशा प्रकारे शैक्षणिक कार्य करणाऱ्या आशिया खंडातील सर्वात मोठ्या शिक्षण संस्थेच्या मॅनेजिंग कैन्सिलच्या दि. ३१/०७/२०२२ रोजी आयोजित केलेल्या बैठकीतील ठराव नंबर ०९ अन्वे आपली रयत शिक्षण संस्थेच्या "जनरल बाँडी सदस्य" म्हणून निवड करण्यात आली आहे. डॉ बाबासाहेब देशमुख यांची निवड झाल्याबद्दल त्यांचे सामाजिक, राजकीय, शैक्षणिक क्षेत्रातून अभिनंदन केले जात आहे.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत