Breaking News
२३ ऑगस्ट २०२२
वाटंबरे महात्मा गांधी तंटामुक्त अध्यक्षपदी भारत पवार व उपाध्यक्षपदी पत्रकार दत्तात्रय पवार यांची निवड...
वाटंबरे/प्रतिनिधी:
सांगोला तालुक्यातील वाटंबरे येथील ग्रामपंचायतीची आज २२ ऑगस्ट रोजी ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते.
या ग्रामसभेत विविध विषयावर चर्चा केली गेली या चर्चेनंतर महात्मा गांधी तंटामुक्त अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाची ची निवड करण्यात आली या वेळी एकमताने गावातील तरुण युवक
भारत पवार यांची महात्मा गांधी तंटामुक्त समितीच्या अध्यक्ष पदी व पत्रकार दत्तात्रय पवार यांची उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली.
माजी गृह मंत्री स्व. आर आर पाटील यांच्या संकल्पनेतून १५ ऑगस्ट २००७ साली महात्मा गांधी तंटामुक्त गाव अभियान हे राबविण्यात आले या अभियानाचा मुख्य हेतू गावातील लोकांना भांडणापासून व पर्यायाने गुन्ह्यांपासून परावृत्त करत गावातील लहान मोठे तंटे गावातच सोडवून पोलिसांवरील ताण कमी व्हावा अशी शासनाची योजना होती.
वाटंबरे गावाने या पंचवार्षिक मध्ये ग्रामपंचायत बिनविरोध निवडून दिली तसेच सोसायटीची निवडणुकही बिनविरोध केली आज झालेल्या महात्मा गांधी तंटामुक्त अध्यक्ष व उपाध्यक्ष या पदाची निवड ही बिनविरोध करत त्यांनी या पदासाठी तरुणांना संधी देत गावाची बिनविरोध परंपरा जपत दुसऱ्या गावांच्या समोर त्यांनी एक आदर्श निर्माण करुण दिला आहे.
यावेळी कार्यकाळ संपलेले माजी तंटामुक्त अध्यक्ष सुब्रावबापू पवार यांचा सत्कार ग्रामपंचायत च्या वतीने करण्यात आला यावेळी त्यांनी आपले मनोगत व्यक्त करताना नुतन अध्यक्ष, उपाध्यक्ष यांनी गावात घडणारे लहान मोठे तंटे पोलीस स्टेशनला न जाऊ देता गावातच सोडवावीत व तंटामुक्त अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाची जबाबदारी त्यांनी व्यवस्थित पार पाडावी व मनोगताच्या शेवटी त्यांनी अध्यक्ष ,उपाध्यक्ष यांच्या पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या.
यावेळी महात्मा गांधी तंटामुक्त नूतन अध्यक्षाचा सत्कार श्री छत्रपती शिवाजी हायस्कूल चे शिक्षक निकम सर यांच्या हस्ते करण्यात आला ,तसेच उपाध्यक्ष दत्तात्रय पवार यांचा सत्कार वाटंबरे गावचे सरपंच किरण पवार यांच्या हस्ते करण्यात आला पशुवैद्यकीय दवाखान्याचे फुले डॉक्टर यांना पंचायत समितीच्या वतीने पुरस्काराने सन्मानित करण्यात आल्यामुळे त्यांचाही सत्कार ग्रामपंचायत वतीने करण्यात आला, सोसायटी सदस्य पदी द्रोपती भगत यांची बिनविरोध निवड झाल्याने त्यांचाही सत्कार ग्रामपंचायत वतीने करण्यात आला .
या वेळी सरपंच किरण पवार, उपसरपंच मोनिका निकम ग्रामसेवक एस आर मोहिते ,तलाठी शिंदे, पोलीस पाटील पांडुरंग पवार, तसेच सर्व ग्रामपंचायत सदस्य संजय गांधी निराधार योजनेचे सदस्य विजय पवार, तंटामुक्ती अध्यक्ष सुब्राव बापू पवार, माजी सरपंच प्रवीण पवार,सोसायटी चेअरमन नाना बापू पवार, माजी सोसायटी चेअरमन अनिल पवार, माजी तंटामुक्ती अध्यक्ष जलतज्ञ मधुकर पवार सर, माजी ग्रामपंचायत सदस्य खंडू पवार, माजी तंटामुक्ती अध्यक्ष प्रतीक दादा पवार ,महादेव बापू पवार, बबन तात्या पवार ,माजी सैनिक भारत धनवडे, आप्पासाहेब गेजगे, उमेश गायकवाड,संजय पवार, धनंजय पवार ,धीरज पवार, आप्पासाहेब गव्हाणे, सुभाष पवार, लक्ष्मण पवार तसेच विविध पक्षातील पदाधिकारी श्री छत्रपती शिवाजी हायस्कूलच्या प्राचार्या सोनवणे मॅडम, जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळेचे केंद्रप्रमुख सर्व शिक्षक, अंगणवाडी सेविका, आरोग्य सेवक, महावितरणचे कर्मचारी, ग्रामपंचायत कर्मचारी व वाटंबरे ग्रामस्थ यावेळी मोठ्या संख्येने ग्रामसभेला उपस्थित होते.
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा