Breaking News

२५ ऑगस्ट २०२२

मा. पंकजकुमार काटे यांची सांगोला तालुका मिशन वात्सल्य या शासकीय समन्वय समितीच्या सदस्यपदी निवड.....

सांगोला: प्रतिनिधी :. नॅशनल दलित मूव्हमेंट फॉर जस्टीस या सामाजिक संगठनेचे सोलापूर जिल्हाध्यक्ष तथा संजय गांधी निराधार समितीचे सदस्य मा. पंकजकुमार काटे यांची मिशन वात्सल्य समितीच्या सांगोला तालुका समन्व्य समितीच्या सदस्यपदी निवड झाली आहे गेली अनेक वर्षे मा.पंकजकुमार काटे सोलापूर जिल्ह्यातील दीन दलित शोषित वंचित निराधार अपंग विकलंगा विधवा परीतक्त्या अनाथ बालके यांच्या उन्नतीसाठी सातत्याने प्रयत्न करीत असतात त्यांच्या या कामाची दखल घेऊन मा. पंकजकुमार काटे यांची सांगोला तालुका मिशन वात्सल्य समितीच्या सदस्यपदी निवड झाली असून त्यांच्या या निवडी बाबत संबंध तालुक्यातील जनतेत आनंदाचे वातावरण आहे त्याच्यावर सर्व स्तरातील जनतेतेतून कौतुकाचा वर्षाव होत आहे...

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा