अखेर अनकढाळ सरपंच पदाची निवडणूक लागली.. सात उमेदवार रिंगणात...
सांगोला प्रतिनिधी
अनकढाळ ता. सांगोला येथील अखेर सरपंच पदासाठी निवडणूक लागली असून, शुक्रवार दिनांक 17 एप्रिल रोजी अर्ज माघार घेण्याच्या दिवशी एकाही उमेदवारांनी अर्ज माघार न घेतल्याने अखेर निवडणूक लागली आहे.
सरपंच पदासाठी खालील उमेदवारांनी अर्ज भरले असून त्यांना आज निवडणूक चिन्ह मिळाले आहे. सुनिता भालचंद्र बंडगर यांना चिन्ह शिट्टी, तर रूपाली शंकर बंडगर यांना चिन्ह खटारा, अंजना विश्वास बंडगर यांना चिन्ह कपाट, कमल रंगनाथ बंडगर यांना चिन्ह कप बशी, ताई संजय बंडगर यांना चिन्ह नारळ, काशीबाई तानाजी बंडगर यांना चिन्ह ऑटोरिक्षा तर मनीषा महादेव बंडगर यांना चिन्ह फुगा मिळाले आहे. सदरची निवडणूक 28 एप्रिल रोजी होत असून, मतमोजणी 29 एप्रिल रोजी होणार आहे असे निवडणूक निर्णय अधिकारी हरिश्चंद्र जाधव यांनी सांगितले.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत