Breaking News

बार्शी बस आगारात स्वच्छतेचा आढावा; अधिकाऱ्यांनी व्यक्त केले समाधान


 विशेष प्रतिनिधी  येताळा खरवडे

काल दिनांक 02.04.2026 रोजी बार्शी आगारात हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ, सुंदर बस स्थानक अभियानाचे चौथे सर्वेक्षण पार पडले. याकरिता प्रादेशिक विभागीय अभियंता श्री नेवरे साहेब अमरावती प्रादेशिक विभाग व प्रादेशिक विभागीय सांख्यिकी अधिकारी श्री नितीन देशमुख साहेब यांनी बार्शी आगरास भेट दिली. यावेळी त्यांनी बार्शी आगारातील स्वच्छतेचा आढावा घेतला. सुलभ शौचालय, चालक वाहक विश्रांती गृहे, हिरकणी कक्ष यांची तपासणी केली तसेच सदरच्या अभियानासाठी ठेवण्यात आलेले सर्व रजिस्टर यांची तपासणी केली बार्शी आगारास मिळणारे वार्षिक उत्पन्न व झालेला फायदा तसेच आगारातील स्वच्छतेसाठी समाधान व्यक्त करून काही महत्त्वाच्या सूचनाही दिल्या.  यावेळी पत्रकार श्री गणेश घोलप व प्रवासी मित्र श्री वाघमारे हे हजर होते. श्री प्रादेशिक विभागीय अभियंता श्री.नेवरे साहेब यांचा सत्कार आगारात नव्याने रुजू झालेले आगार व्यवस्थापक श्री संजय हरिभाऊ भोसले साहेब यांनी केला. तसेच प्रादेशिक विभागीय सांख्यिकी अधिकारी श्री नितीन देशमुख साहेब यांचा सत्कार आगारातील  सहाय्यक वाहतूक निरीक्षक श्री विजय तानाजी हांडे साहेब यांनी केला. आगारातील स्वच्छतेसाठी कार्यशाळा कर्मचारी, उपस्थित चालक वाहक प्रशासकीय कर्मचारी यांनी मोलाचे योगदान दिले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत