अभिनव पब्लिक स्कूल, अजनाळे येथे विज्ञान प्रदर्शन उत्साहात संपन्न
सांगोला गौरव न्यूज नेटवर्क
अभिनव पब्लिक स्कूल, अजनाळे येथे दिनांक 07 मार्च 2026 रोजी विज्ञान प्रदर्शन उत्साहात संपन्न झाले. 28 फेब्रुवारी – राष्ट्रीय विज्ञान दिन निमित्त विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या विविध वैज्ञानिक प्रयोगांचे व प्रकल्पांचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते.
या प्रदर्शनाचे उद्घाटन PSI पदावर निवड झालेल्या सुमित गणपत येलपले यांच्या हस्ते करण्यात आले. Sr. Kg पासून ते 9 वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांनी एकूण 51 प्रयोगांद्वारे या प्रदर्शनामध्ये आपला सहभाग नोंदवला. विद्यार्थ्यांनी आपल्या प्रयोगांचे सादरीकरण अतिशय सुंदर व माहितीपूर्ण पद्धतीने केले.सदर विज्ञान प्रदर्शनामध्ये विद्यार्थ्यांनी ग्लोबल वॉर्मिंग, सोलर सिस्टीम, लेझर सिक्युरिटी सिस्टम, डायजेस्टिव्ह सिस्टीम, पॉल्युशन कंट्रोल, फार्मिंग एक्सपेरिमेंट, इन्सेक्ट स्प्रे पंप, इलेक्ट्रिक जनरेटर यांसारखे विविध प्रयोग सादर केले. या प्रयोगांनी उपस्थित पालक व पाहुण्यांचे विशेष लक्ष वेधून घेतले. विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या या विविध वैज्ञानिक व सर्जनशील प्रयोगांचे उपस्थित मान्यवर व पालकांनी मनापासून कौतुक केले. विज्ञान प्रदर्शन पाहण्यासाठी पालकांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती.
तसेच महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या परीक्षेत PSI (पोलीस उपनिरीक्षक) पदावर निवड झाल्याबद्दल सुमित गणपत येलपले यांचा संस्थेचे संस्थाध्यक्ष मा. शिवाजी लाडे सर व मुख्याध्यापिका कावेरी लाडे मॅडम यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
संस्थाध्यक्ष लाडे सर व मुख्याध्यापिका कावेरी लाडे मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विशेष परिश्रम घेतले. अत्यंत उत्साही वातावरणात व शिस्तबद्ध पद्धतीने हा कार्यक्रम यशस्वीरित्या संपन्न झाला.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत