नाझरे येथे हिंदू संमेलनाचे आयोजन..
नाझरे प्रतिनिधी
नाझरे या संताच्या पावनभूमीत सोमवार दिनांक 30 मार्च रोजी सायंकाळी सहा वाजता वीरभद्र मंदिर नाझरे ता. सांगोला येथे हिंदू संमेलनाचे आयोजन करण्यात आले असल्याचे सकल हिंदू समाज नागरिक यांच्यावतीने सांगण्यात आले.
संस्कृती आणि एकतेचा दिवा अधिक प्रखर करण्यासाठी व संस्कृतीचे रक्षण व संवर्धन राखण्यासाठी हे संमेलन आयोजित केले असून, यामध्ये पद्म भास्कर डॉक्टर नीलकंठ शिवाचार्य धारेश्वर महास्वामीजी यांचे आशीर्वाचन आयोजित केले आहे. तसेच डॉक्टर सचिन लादे व आनंदी संस्थेचे अध्यक्षा श्रीमती अपर्णाताई साळुंखे यांचेही मार्गदर्शन लाभणार आहे तसेच महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे तरी सदर संमेलनास सर्वांनी उपस्थित राहावे असे आवाहन संयोजकातर्फे करण्यात आले आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत