Breaking News

नाझरे येथील बाजार चौकात वाहतूक कोंडीमुळे नागरिक त्रस्त..! पूर्णवेळ वाहतूक पोलिसांची नेमणुकीची मागणी..


 नाझरे प्रतिनिधी 

      नाझरे ता. सांगोला येथे नाजरे, बलवडी, चोपडी, वझरे, अनकढाळ, राजुरी, उदनवाडी, कारंडेवाडी, चिनके इत्यादी गावे व त्याखालील वाड्यावर त्याचे नागरिक महिला, व्यापारी दर शुक्रवारी आठवडा बाजारात येतात व नाझरे हे गाव सांगोला तालुक्यातील मोठे गाव असून, बाजार मोठा भरतो, व गेल्या कित्येक महिन्यापासून बाजार चौकात वाहतूक कोंडी होत असून, चौकातून सांगोला, पंढरपूर, सोलापूर, आटपाडी, दिघंची, जत, सांगली इत्यादी गावास वाहने या चौकातून जातात व यातच मोटरसायकलीची भर जास्त, कोण, कोठेही लावतो व त्यामुळे वाहतूक कोंडी वारंवार होते व प्रवासाचा वेळही जास्त जातो व यातच व्यापारी, महिला, नागरिक व शालेय विद्यार्थी यांची येणे झाले त्यामुळे यांना फटका बसत असून मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत आहे. 

     तसेच येथून पंढरपूरला जाणाऱ्या भाविकांची ही संख्या जास्त आहे यातच मालवाहतूक मोठ्या गाड्या, ट्रॅक्टर, दुचाकी व चार चाकी मुळे बाजार चौकात सतत गर्दी असते व यातच भर चौकात वाहने पार्किंग त्यामुळे वाहतूक कोंडीत भर पडत आहे व याचा फटका महिला, नागरिक, शालेय विद्यार्थी, प्रवासी धारकास, बसत आहे व त्यामुळे नागरिकांतून नाराजी पसरली आहे तरी प्रशासनाने या वाहतूक समस्येकडे लक्ष देणे गरजेचे आहे व कायमस्वरूपी वाहतूक ट्राफिक पोलिसांची नेमणूक करावी व तातडीने उपाययोजना कराव्यात अशी नागरिकांची मागणी आहे. 

    नाझरे हे गाव सांगोल तालुक्यातील मोठे गाव व बाजारपेठेचे असून यातच चुकीच्या पद्धतीने पार्किंग याची भर पडत आहे व पोलीस कर्मचाऱ्यांची उपस्थिती नसल्याने नागरिकात नाराजीचा स्वरूपत आहे तरी कायमस्वरूपी पोलिसांची नेमणूक व्हावी अशी मागणी व्यापारी, महिला, विद्यार्थी व नागरिक वर्गातून केली जात आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत