ज्योतिर्लिंग दूध संस्था व सूर्योदय डेअरी तर्फे सभासदांना दीपावली भेटवस्तू वाटप शुभारंभ संपन्न..
नाझरे प्रतिनिधी
नाझरे ता. सांगोला येथे ज्योतिर्लिंग दूध उत्पादक संस्था व सूर्योदय ऑनलाईन डेअरी यांच्यावतीने सभासदांना दीपावली निमित्त भेटवस्तू वाटप शुभारंभ संपन्न झाला. यावेळी सूर्योदयचे अधिकारी राहुल सोनलकर, ज्ञानेश्वर वाघमोडे, रमाकांत घुले, नितीन सरगर यांचे व सर्व सभासदांचे स्वागत डेअरी चालक नागेश रायचूरे यांनी केले.
प्रत्येक सभासदांना साखर, गरा, हरभरा डाळ, मैदा, मोती साबण व उटणे इत्यादी दरवर्षी देत असल्याचे संस्थेचे अध्यक्ष नागेश रायचूर यांनी सांगितले. यावेळी शिवाजी सरगर, विकास रायचुरे, सागर रायचुरे,, धनाजी चव्हाण, सुखदेव गीडे, भारत वाघमारे, गंगाधर जोंधळे, बाळू पाटील, विश्वनाथ पाटील, शरद गुरव, किरण सुतार, नितीन वाघमारे, संजय चौगुले, वसंत अडसूळ, राहुल आडसुळ, सत्यजित पाटील, प्रकाश पाटील, पोपट जोंधळे, ओंकार विभुते, शामराव बोराडे, महादेव वाघमोडे, दत्ता पाटील, गणेश बनसोडे, रावसाहेब रेड्डी, अशोक मंडले इ. सभासद हजर होते. शेवटी सर्वांचे आभार वैभव अडसूळ यांनी मानले.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत