अन्नछत्र मंडळाचे कार्य सेवाभावी वृत्तीचे..
सांगोला प्रतिनिधी
श्री स्वामी समर्थ अन्नक्षेत्र मंडळाचे नियोजन, स्वच्छता व येथे भक्तासाठी सुरू केलेले सेवाभावी वृत्ती चे हे कार्य उल्लेखनीय असून, कौतुकास्पद आहे. अन्नक्षेत्र सेवा समाधानकारक आहे असे मत सांगोला तालुका ग्रामीण पत्रकार संघटनेचे अध्यक्ष रविराज शेटे यांनी व्यक्त केले.
अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जन्म जय राजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यकारी अध्यक्ष अमोल राजे भोसले यांनी स्वामी भक्तासाठी निस्वार्थीपणाने सुरू केलेले हे कार्य सेवाभावी वृत्तीचे व कौतुकास्पद आहे. यावेळी श्री ची प्रतिमा, मूर्ती, कृपा वस्त्र व श्रीफळ मंडळाच्या वतीने देऊन शेटे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी सांगोला तालुका शिक्षक संघाच्या अध्यक्ष सौ योगिता शांत शेटे, योगीराज शेटे, सौ. सुकन्या शेटे, प्रणव राज शेटे, अक्कलकोट तालुका वृत्तपत्र विक्रेता अध्यक्ष मल्लिकार्जुन कोरे व कर्मचारी, भक्तगण उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत