श्री स्वामी महाराज यांच्या दर्शनामुळे ऊर्जा, प्रेरणा प्राप्त
सांगोला प्रतिनिधी
श्री क्षेत्र अक्कलकोट येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज यांच्या दर्शनामुळे ऊर्जा व प्रेरणा मिळाली व श्री चे मनोभावे दर्शन झाले व त्यामुळे कृतार्थ झालो, असे मत सांगोला तालुका ग्रामीण पत्रकार संघटनेचे अध्यक्ष रविराज शेटे यांनी मंदिरात सत्कार प्रसंगी मत व्यक्त केले.
मंदिर समितीचे चेअरमन महेश जी इंगळे यांच्या शुभहस्ते श्री चे कृपा वस्त्र, प्रसाद, प्रतिमा देऊन सत्कार करण्यात आला. तसेच सर्व भक्तासाठी हे एक श्रद्धास्थान आहे.
यावेळी सांगोला तालुका शिक्षक संघाच्या अध्यक्षा सौ. योगिता शांत शेटे, सौ. सुकन्या शेटे, योगीराज शेटे, प्रणव राज शेटे, अक्कलकोट तालुका वृत्तपत्र विक्रेता संघटनेचे अध्यक्ष मल्लिकार्जुन कोरे, कर्मचारी, भक्तगण उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत