Breaking News

पायोनियर निवासी गुरुकुल येथे शिक्षक दिन मोठ्या उत्साहात साजरा


 सांगोला गौरव न्यूज

समाज उन्नतीसाठी सतत कार्यरत राहून युवा पिढीतून ज्ञानाधिष्ठित समाज घडवून देशाच्या सर्वांगीण विकासात बहुमोल मार्गदर्शन देणारे भारताचे दुसरे राष्ट्रपती, तत्त्वज्ञ आणि शिक्षकतज्ञ भारतरत्न डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन यांची जयंती ' शिक्षक दिन' पायोनियर निवासी गुरुकुल य.मंगेवाडी येथे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आली.

      कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे संस्थाध्यक्ष श्री.अनिल येलपले सर होते.आजच्या दिवशी शिक्षकांच्या भूमिकेत लाभलेल्या इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांच्या हस्ते प्रतिमापूजन व दिपप्रज्वलन करण्यात आले.यावेळी संस्थाध्यक्षांच्या भूमिकेत पियुष कोळवले व गुरुकुलच्या प्राचार्यांच्या भूमिकेत श्रेयस येलपले हे विद्यार्थी होते. याप्रसंगी पायोनियर निवासी गुरुकुलचे प्राचार्य डॉ. अमोल रणदिवे सर स्कूलच्या सचिवा मनीषा येलपले मॅडम,अकॅडमी इन्चार्ज सोमनाथ आदलिंगे सर,ज्योती रणदिवे मॅडम,पूजा होटे मॅडम,अजित रणदिवे सर,दिलीप जावीर सर,समाधान सातपुते सर आदी मान्यवर तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

         इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांनी शिक्षकाची भूमिका करून दिवसभर अध्यापनाचे कार्य करत शिक्षकांचे महत्त्व जाणून घेतले. तसेच कर्मचाऱ्यांची भूमिका पार पाडताना त्यांच्या कार्याचे महत्त्व त्यांना पटले.शिक्षक दिनाच्या कार्यक्रम प्रसंगी शिक्षकांबद्दल आदर व्यक्त करत शिक्षकांचा विद्यार्थ्यांच्या वतीने सन्मान करण्यात आला तसेच शिक्षकांसाठी संगीत खुर्ची,तळ्यात मळ्यात यांसारख्या निरनिराळ्या खेळांचे आयोजन विद्यार्थ्यांकडून करण्यात आले. कार्यक्रमाच्या समारोपाप्रसंगी छात्र शिक्षकांनी आपले अनुभव कथन केले.

       अध्यक्षीय भाषणात मा.अनिल येलपले सर यांनी गुरूंची महती विद्यार्थ्यांना सांगितली. तसेच प्राचार्य डॉ.अमोल रणदिवे सर व इतर शिक्षकांनी बहुमूल्य असे मार्गदर्शन विद्यार्थ्यांना केले.

        या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार दहावीच्या विद्यार्थ्यांनी कु.प्रणिती पवार व कु. निधीशा बाबर यांनी केले.कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांनी मोलाची कामगिरी पार पाडली,त्यांना वर्गशिक्षिका ज्योती रणदिवे मॅडम तसेच इतर शिक्षकांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत