क्रांतीज्योती महिला पतसंस्था नाझरे शाखेत रविवारी महिलांसाठी हळदीकुंकवाचा कार्यक्रम..! ऍडवोकेट डॉ. राजेश्वरी केदार यांचे व्याख्यान
नाझरे प्रतिनिधी
नाझरे ता. सांगोला येथील क्रांतीज्योती महिला नागरी सहकारी पतसंस्थेत रविवार दिनांक 28 सप्टेंबर रोजी सकाळी साडेअकरा वाजता महिलांसाठी हळदी कुंकू यांचे भव्य आयोजन केले असल्याचे चेअरमन सौ. भाग्यश्री बनकर यांनी सांगितले.
सदर प्रसंगी महिलांना मार्गदर्शन करण्यासाठी ऍडवोकेट डॉ. राजेश्वरी केदार उपस्थित राहणार आहेत व त्यांचे व्याख्यान आयोजित केले आहे तरी सर्व महिलांनी उपस्थित राहावे असे आवाहन व्हा. चेअरमन सौ. दिपाली बनकर यांनी केले आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत