नाझरे येथे स्वस्थ नारी, सशक्त परिवार या अभियानाचा डॉ. निकिता ताई देशमुख यांच्या शुभहस्ते शुभारंभ संपन्न...
नाझरे प्रतिनिधी
स्वस्थ नारी सशक्त परिवार या अभियानातून महिलांनी विशेषता मुलींनी आपले हिमोग्लोबिन तपासणी गरजेचे आहे तसेच कॅन्सर रोग ही बरा होतो परंतु सध्या स्त्री ही दुर्लक्षित घटक आहे तर असे न करता तिची काळजी घेणे गरजेचे आहे, व मुलींनी मासिक पाळी मध्ये आईचा व डॉक्टरांचा सल्ला घेऊन याचा शिक्षणावर परिणाम न होता आयपीएस, आयएएस अधिकारी बनणे गरजेचे आहे. तसेच जि.प. प्राथमिक आरोग्य केंद्र नाझरे ता. सांगोला येथे आल्यावर स्वर्गीय आबासाहेब व बंडगर सर यांची आठवण येते असे डॉक्टर निकिता ताई देशमुख यांनी शुभारंभ प्रसंगी मत व्यक्त केले व तसेच महिलांनी योग्य संतुलित आहार व निरोगी शरीर राहण्यासाठी काळजी घ्या असे आवाहनही देशमुख यांनी केले.
सुरुवातीस सौ. योजना मोहिते यांनी प्रास्ताविक केले. तर 17 सप्टेंबर ते २ ऑक्टोबर दरम्यान हे अभियान राबविण्यात येत आहे तरी महिलांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. संदीप देवकते यांनी केले. यावेळी डॉ. सौ. मेघना देवकते, मा. उपसभापती सुनील चौगुले यांनी ही मत व्यक्त केले. सदर प्रसंगी जि.प. सदस्य दादासो बाबर, मा. जि.प. सदस्या विमलताई बंडगर, सरपंच सौ. अर्चना सरगर, मा. सरपंच सौ. मंदाकिनी सरगर, संजय सरगर, ग्राम. सदस्य मधुकर आलदर, शशिकांत पाटील, डॉ. विजय सरगर, वैद्यकीय अधिकारी डॉ. धायगुडे, डॉ. पडवळे, डॉ. निरंजन केदार, डॉ. सौ. केदार, डॉ, अमोल पाटील, डॉ. देशमुख, डॉ. रमेश मोहिते, डॉ. संजय राठोड, पत्रकार रविराज शेटे, , आरोग्य सहाय्यक, सेविका, अशा गटप्रवर्तक, आशा सेविका, सर्व कर्मचारी, महिला, शिक्षिका, विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. सूत्रसंचालन प्रा.विजय गोडसे, तर आभार डॉ. प्रशांत शिंदे यांनी मानले.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत