अभिनव पब्लिक स्कूल व निवासी गुरुकुल अजनाळे येथे आरोग्य तपासणी शिबिर संपन्न..
अजनाळे:सोमवार दि.4 ऑगस्ट 2025 रोजी जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद सोलापूर, मा. डॉ. संतोष नवले सर यांच्या आदेशानुसार तसेच तालुका आरोग्य अधिकारी, पंचायत समिती सांगोला, मा. डॉ. संदीप देवकते सर आणि वैद्यकीय अधिकारी, प्राथमिक आरोग्य केंद्र नाझरे, डॉ. अजित धायगुडे यांच्या मार्गदर्शनाखाली अभिनव पब्लिक स्कूल व निवासी गुरुकुल ,अजनाळे येथे गोवर-रुबेला संदर्भात सर्वेक्षण करण्यात आले.
या आरोग्य शिबिरात सर्व निवासी विद्यार्थ्यांची सविस्तर आरोग्य तपासणी करण्यात आली. तपासणी दरम्यान गोवर-रुबेला संदर्भात एकही संशयित रुग्ण आढळून आला नाही. याचबरोबर अभिनव पब्लिक स्कूल, अजनाळे येथील सर्व विद्यार्थी मुले व मुली यांची आरोग्य तपासणी व वैयक्तिक स्वच्छतेची पाहणी करण्यात आली.
तपासणी दरम्यान किरकोळ आजारांवर औषधोपचार करण्यात आले, तसेच सर्व विद्यार्थ्यांना मलेरिया, डेंगू, चिकनगुनिया, कुष्ठरोग, साथरोग, गोवर-रुबेला यासारख्या रोगांबाबत सविस्तर आरोग्य शिक्षणही देण्यात आले. प्राथमिक आरोग्य केंद्र नाझरेचे आरोग्य सहाय्यक श्री. अशोक कलाल यांनी विद्यार्थ्यांना माहितीपूर्ण मार्गदर्शन केले.
यावेळी प्राथमिक आरोग्य उपकेंद्र, अजनाळे येथील आरोग्य सेविका सिंधुताई गडदे, आशा वर्कर ज्योती येलपले, रंजना येलपले व पल्लवी धांडोरे आदी उपस्थित होते.
शाळा तपासणी कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी शाळेचे संस्थापक अध्यक्ष मा. शिवाजीराव लाडे सर, मुख्याध्यापिका कावेरी गिड्डे मॅडम व संपूर्ण शिक्षकवृंद यांनी उत्तम सहकार्य केले.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत