महसूल सप्ताह २०२५ अंतर्गत तहसिल कार्यालय सांगोला येथे कार्यक्रमाचे आयोजन
सांगोला ( प्रतिनिधी )- सांगोला तालुक्यात दिनांक ०१ ऑगस्ट २०२५ ते दिनांक ०७ ऑगस्ट २०२५ या दरम्यान महसूल सप्ताह साजरा करणेत येत आहे.
. या महसुल सप्ताहामध्ये दिनांक ०४/०८/२०२५ रोजी दुपारी २.०० वाजता मा. आमदार डॉ. श्री. बाबासाहेब देशमुख यांचे प्रमुख उपस्थितीत तहसिल कार्यालय सांगोला येथे कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाचे मा. आमदार साहेब यांचे हस्ते दिपप्रज्वलीत करून कार्यक्रमास सुरुवात करणेत आली. सदर कार्यक्रमास उपस्थित आमदार साहेब यांचे श्री. संतोष कणसे, तहसिलदार सांगोला यांचे हस्ते पुष्पगुच्छ व शाल देवून स्वागत करण्यात आले. कार्यक्रमास उपिस्थत सर्व मान्यवर, अधिकारी, कर्मचारी व सर्व नागरिकांचे स्वागत करून श्री. संतोष कणसे, तहसिलदार सांगोला यांनी दि. ०१/०८/२०२५ ते ०७/०८/२०२५ या कालावधीत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनाबाबत सविस्तर माहिती दिली. तदनंतर श्रीमती विजया नाईक, मंडळ अधिकारी संगेवाडी यांनी महसूल कामकाजाविषयी अवगत केले. तदनंतर शासकीय जागेवर सन २०११ पुर्वी पासून रहिवासी प्रयोजनार्थ घरकुल मंजूर झाले आहे अशा १७ लाभार्थ्यांना मा. आमदार साहेब यांचे हस्त पटटे वाटप करण्यात आले. सांगोला तालुकेतील सेवानिवृत्त अधिकारी व कर्मचारी यांचा पुष्पगुच्छ व श्रीफळ देवून सत्कार करण्यात आला. तसेच तहसिल कार्यालयातील नायब तहसिलदार, ०२ सहायक महसूल अधिकारी, ०९ मंडळ अधिकारी, १० ग्राम महसूल अधिकारी, ०८ महसूल सहायक, १० महसूल सेवक, १० पोलीस पाटील, ०५-संगणक ऑपरेटर, तसेच १००% KYC व धान्य वाटप पुर्ण केलेले दुकानदार यांचे मा. आमदार साहेब यांच्या हस्ते, सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देवून गौरव करण्यात आला. तदनंतर श्री. सोमनाथ साळुंखे, निवासी नायब तहसिलदार सांगोला यांनी सर्व उपस्थित मान्यवरांचे आभार मानले.
तसेच पाणंद शिव रस्त्याची मोजणी करून मौजे धायटी, चिंचोली व डोंगरगांव येथे दि. ०३/०८/२०२५ व ०४/०८/२०२५ रोजी श्री. बी आर माळी, मा. उपविभागीय अधिकारी मंगळवेढा विभाग मंगळवेढा व श्री. संतोष कणसे, तहसिलदार सांगोला यांचे उपस्थितीत ११२ दुतर्फा वृक्षारोपण करण्यात आले.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत