Breaking News

गुरुपौर्णिमेनिमित्त कोळे मठात गुरु दीक्षाविधी सोहळ्याचे आयोजन...


 नाझरे प्रतिनिधी 

        श्री गुरुनिर्वाण रुद्र पशुपती कोळेकर महास्वामीजी यांच्या कृपाशीर्वादाने तिसावे पिठाधिपती व श्री श्री श्री 108 गुरुमूर्ती निर्वाण रुद्र पशुपती महास्वामीजी 31 वे पिठाधिपती यांच्या गुरुतत्त्वाखाली व मार्गदर्शनाखाली कोळे मठात ता. सांगोला गुरुपौर्णिमेनिमित्त गुरुवार दिनांक 10 जुलै रोजी भव्य गुरु दीक्षाविधी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. 

       दीक्षा घेणाऱ्या शिवभक्तांनी सकाळी आठ वाजता कोळे मठात उपस्थित राहताना नारळ, लिंग, शिव दोरा, रुद्राक्ष, केळी, अक्षदा, नवीन वस्त्र, वाटी, केला, तांब्या यापैकी एक पात्र व दक्षिणा इत्यादी साहित्य बरोबर आणावे. सकाळी आठ वाजता दीक्षाविधी कार्यक्रमास सुरुवात होईल तसेच महास्वामींचे आशीर्वचन व यंदाचा गुरुपौर्णिमेचा महाप्रसाद श्रीमती मंदाकिनी विलास शिवपुजे यांचा होणार आहे तरी शिवभक्तांनी गुणदर्शनाचा लाभ घेऊन जेवण कृतार्थ करावे व यासाठी कोळेमटात उपस्थित रहावे असे आवाहन गुरुपौर्णिमा उत्सव कमिटी, वीरशैव तरुण मंडळ व ग्रामस्थ कोळे यांनी केले आहे.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत