Breaking News

आदर्श शिक्षक, भ्रष्टाचार निर्मूलन चळवळीचे प्रणेते प्रा. उत्तमराव घाटुळे यांचे कार्य कौतुकास्पद: माजी कुलगुरू डॉ. बाबासाहेब बंडगर ..! प्रा. उत्तमराव घाटुळे यांचा अमृत महोत्सव व "उत्तम ते सर्वोत्तम" या गौरव ग्रंथाचा प्रकाशन सोहळा मान्यवरांच्या हस्ते संपन्न


 सांगोला प्रतिनिधी: प्रा. उत्तमराव घाटुळे यांनी कठीण परिस्थितीतून शिक्षण पूर्ण करून सांगोला विद्यामंदिर येथे प्रा. म्हणून ज्ञानदानाचे आदर्शवत कार्य केले. दुसऱ्यांची मुलं शिकावीत ही त्यांची तळमळ होती. अतिशय शांत ,संयमी, तत्वनिष्ठ, जगण्याचे मूल्य शिकवणारे व्यक्तिमत्व म्हणून प्रा. उत्तमराव पाटुळे यांच्याकडे पाहिले जाते. प्रा. उत्तमराव घाटुळे हे क्रीडापटू होते. प्रा. उत्तमराव पाटुळे यांनी स्वतःसाठी व समाजासाठी खूप काही केले आहे. एक आदर्श शिक्षक व भ्रष्टाचार निर्मूलन चळवळीचे प्रणेते, पाणी चळवळीचे मार्गदर्शक म्हणून सर्वांना परिचित आहेत. प्रा. उत्तमराव घाटुळे यांनी सांगोला विद्यामंदिरमध्ये उपप्राचार्य म्हणूनही उत्तमप्रकारे काम कार्य केले आहे. प्रा. उत्तमराव घाटुळे यांचे शैक्षणिक व सामाजिक कार्यातील अनुभव मोठे आहेत. अनेकांना केलेले मार्गदर्शन व विविध समितीवर शैक्षणिक कार्यासाठी दिलेले योगदान लाख मोलाचे ठरले आहे. प्रा. उत्तमराव घाटुळे यांचे शैक्षणिक, सामाजिक क्षेत्रातील कार्य आदर्शवत आहे. असे गौरवोद्गार सोलापूर विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. बाबासाहेब बंडगर यांनी सांगोला येथे व्यक्त केले.

सांगोला विद्यामंदिर प्रशाला जुनिअर कॉलेजचे सेवानिवृत्त उपप्राचार्य प्रा. उत्तमराव घाटुळे यांचा अमृत महोत्सव सोहळा व" उत्तम ते सर्वोत्तम "या गौरव ग्रंथाचा प्रकाशन सोहळा मान्यवरांच्या हस्ते संपन्न झाला. यावेळी माजी कुलगुरू डॉ. बाबासाहेब बंडगर हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून बोलत होते. सोमवार दि. 21 जुलै 2025 रोजी  सदानंद मल्टीपर्पज हॉल सांगोला येथे सदरचा कार्यक्रम संपन्न झाला .

यावेळी प्रस्ताविकपर मनोगतात माजी प्राचार्य डॉ. कृष्णा इंगोले म्हणाले, प्रा. उत्तमराव घाटोळे यांना 75 वर्ष पूर्ण झाली असून त्यांचा अमृतमहोत्सव सोहळा हा त्यांच्या जीवनातील सुवर्णक्षण आहे . यांचे शैक्षणिक व सामाजिक कार्य अतिशय उत्कृष्ट आहे. त्यांच्या जीवनावर आधारित उत्तम चे सर्वोत्तम हा गौरव ग्रंथ लिहिला आहे. प्रा. उत्तमराव घाटुळे हे उत्कृष्ट खेळाडू व पैलवान होते .तसेच ते उत्कृष्ट प्राध्यापक ही होते .विद्यामंदिर मध्ये त्यांनी अनेक जबाबदाऱ्या प्रामाणिकपणे व समर्थपणे पार पाडल्या. त्यांचा आदर्श घेण्यासारखा आहे.

      ‌.        यावेळी सांगोला तालुका उच्च शिक्षण मंडळाचे अध्यक्ष बाबुराव गायकवाड, सांगोला तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष प्रा. प्रबुद्धचंद्र झपके, रामचंद्र कंडरे, प्रा. राजेंद्र ठोंबरे, प्रा, स्वाती घाटुळे -चौगुले, प्रा. हेमंत आदलिंगे, रणजीत मंगडकर, पत्रकार नागेश जोशी, सुवर्णा इंगोले मॅडम आदी मान्यवरांनी मनोगतात सांगितले की, प्रा. उत्तमराव घाटुळे यांना उत्तम दीर्घायुष्य लाभावे. त्यांचे शैक्षणिक सामाजिक क्षेत्रातील कार्य आदर्शवत व प्रेरणादायी असे आहे. सरांचे अक्षर अतिशय सुंदर होते. त्यांनी शैक्षणिक कार्यकाळात चांगली शैक्षणिक सेवा केली. प्रा. उत्तमराव घाटुळे हाडाचे शिक्षक आहेत.  सरांनी विद्यार्थ्यांच्या अनेक पिढ्या घडविल्या. शिक्षक समाजाला दिशा देण्याचे कार्य करतात. त्यामुळेच समाजात ते  लोकप्रिय होतात.


चौकट १) :  विद्यार्थी दशेत मी खूप कष्ट घेतले. एक उत्तम खेळाडू म्हणून चांगली कामगिरी पार पाडली. जीवनात अनेक गुरुवर्यांचे मार्गदर्शन उपयुक्त ठरले. विविध प्रकारच्या सामाजिक कार्यासाठी अनेकांचे सहकार्य व मार्गदर्शन लाभले. यावेळी आपल्या गुरुविषयी आठवणी व्यक्त करताना प्रा. उत्तमराव घाटुळे यांना अश्रू अनावर झाले. सामाजिक कार्यात अनेकांना गुरु मानले. मी शैक्षणिक व सामाजिक कार्य प्रामाणिकपणे पूर्ण केले. अनेकांना अडचणी प्रसंगी मदत केली. अनेकांना वेगवेगळ्या क्षेत्रात मार्गदर्शन करून त्यांच्या जीवनात उजेड निर्माण केला .माझ्या जीवनातील 75 वा वाढदिवस व "उत्तम ते सर्वोत्तम" या गौरव ग्रंथाचा प्रकाशन सोहळा हा ऐतिहासिक क्षण ठरणार आहे. अमृत महोत्सव सोहळ्यानिमित्त प्रा. उत्तमराव घाटुळे व अर्धांगिनी निर्मलाताई घाटुळे यांचा एकत्रित सत्कार हा केलेल्या कार्याची पोचपावती आहे: प्रा. उत्तमराव शामराव घाटुळे सेवानिवृत्त  प्रा. व उपप्राचार्य सांगोला विद्यामंदिर सांगोला

चौकट २) कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे प्रकाश वडगावकर यांनी प्रा. उत्तमराव घाटुळे यांच्या जीवनाविषयी गौरवउद्गार व्यक्त केले .सर्वसामान्य कुटुंबात प्रा. उत्तमराव घाटुळे यांचा जन्म झाला. त्यांना 75 वर्षे पूर्ण झाली तरीही ते आपणास तरुणच दिसतात. सांगोला तालुक्यातील विद्यार्थी घडवण्यात त्यांचा मोलाचा वाटा आहे. या भागातले विद्यार्थी जगाच्या कानाकोपऱ्यात तालुक्याचे नाव उज्वल करीत आहेत .प्रा. उत्तमराव घाटुळे व माजी कुलगुरू डॉ. बाबासाहेब बंडगर यांच्यामुळे तालुक्यात शैक्षणिक प्रगतीला नवी दिशा मिळाली. वैचारिक पातळीवर सरांचे कार्य अग्रेसर ठरले आहे. सरांना दीर्घायुषी लाभावे अशी सदिच्छा व्यक्त केली.

 : :प्रकाश वडगावकर, प्रमुख पाहुणे 


चौकट ३) प्रा. उत्तमराव घाटुळे यांच्या अमृतमहोत्सवी सोहळ्यानिमित्त "उत्तम ते सर्वोत्तम "या ग्रंथाचे प्रकाशन कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी कुलगुरू डॉ. बाबासाहेब बंडगर, प्रमुख पाहुणे प्रकाश वडगावकर, अध्यक्ष बाबुराव गायकवाड, अध्यक्ष प्रा. पी.सी झपके, निर्मलाताई घाटुळे, माजी प्राचार्य व ज्येष्ठ साहित्यिक डॉ. कृष्णा इंगोले, संपादक भाऊसाहेब पवार आदी मान्यवरांच्या हस्ते संपन्न झाले, प्रा. उत्तमराव घाटुळे यांच्या 75 व्या वाढदिवसानिमित्त अमृत महोत्सव सोहळा केक कापून साजरा करण्यात आला. तसेच पुस्तक व धान्य तुला करण्यात आली. यावेळी चैतन्य हास्य क्लब सांगोला व विद्यामंदिरच्या सेवानिवृत्त शिक्षकांच्या वतीने प्रा. उत्तमराव घाटुळे यांचा सन्मान करण्यात आला. विविध क्षेत्रातील मान्यवर, प्राध्यापक वर्ग, मित्रपरिवार, पत्रकार बांधव , सामाजिक कार्यकर्ते,नातेवाईक यांच्या हस्ते घाटुळे सरांचा सत्कार सोहळा संपन्न झाला. यावेळी माजी प्राचार्य डॉ. कृष्णा इंगोले, प्रा, राजेंद्र ठोंबरे, गौरव ग्रंथाचे संपादक भाऊसाहेब पवार यांचा सत्कार समितीच्या वतीने विशेष सन्मान करण्यात आला.

चौकट ४) यावेळी प्रा. उत्तमराव घाटुळे यांच्या जीवनावर आधारित उत्तम ते सर्वोत्तम या गौरव ग्रंथात घाटुळे सरांच्या जीवनावर आधारित अनेक लेख समाविष्ट आहेत. या गौरव ग्रंथासाठी माजी प्राचार्य डॉ. कृष्णा इंगोले, प्रा. राजेंद्र ठोंबरे यांचे मोलाचे सहकार्य लाभले, गौरव ग्रंथामध्ये अनेक क्षेत्रातील मान्यवरांच्या लेखांचा समावेश आहे .या लेखाच्या माध्यमातून गौरव ग्रंथांमध्ये सरांच्या जीवनावर आधारित लेख समाविष्ट असून सर्वांना ते मार्गदर्शक ठरतील व सरांचे जीवन जवळून अनुभवता येईल. त्यातून वेगळी दिशा व प्रेरणा प्रेरणा मिळेल : 

भाऊसाहेब पवार सर "उत्तम ते सर्वोत्तम "गौरव ग्रंथाचे संपादक , विद्यामंदिर शिक्षक .

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत