Breaking News

नाझरे येथे श्रावण मासानिमित्त विरभद्र मंदिर व महादेव मंदिर येथे विविध कार्यक्रमाचे आयोजन..! शिवाचार्य धारेश्वर महास्वामीजी यांचे अनुष्ठान...


नाझरे प्रतिनिधी 

      नाझरे ता. सांगोला येथील वीरभद्र मंदिर व महादेव मंदिर येथे श्रावण मासानिमित्त शुक्रवार 25 जुलै ते शनिवार 23 ऑगस्ट अखेर विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. 

       शुक्रवार दिनांक 25 जुलै रोजी डॉक्टर नीलकंठ शिवाचार्य धारेश्वर महास्वामीजी यांचे पहाटे चार वाजता वीरभद्र मंदिर येथे अनुष्ठान, पहाटे पाच वाजता श्री रुद्राभिषेक व शिवनाम जप, आरती व सकाळी आठ वाजता नगर प्रदर्शना दिंडी महादेव मंदिर येथून निघेल तसेच सकाळी नऊ वाजता ईस्टलिंग महापूजा, दुपारी चार वाजता भजन व सायंकाळी पाच वाजता शिवपाठ तसेच रात्री सात वाजता धारेश्वर महास्वामींचे प्रवचन व महाप्रसाद होईल. 


  शुक्रवार 25 जुलै ते शनिवार 23 ऑगस्ट अखेर दररोज पहाटे पाच ते सहा शिवनाम जप वीरभद्र मंदिर येथे तर नगरप्रदक्षिणा, दिंडी सोहळ्याचे महादेव मंदिर येथून आयोजन करण्यात आले आहे. तरी शिवभक्तांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन समस्त नाझरे, वझरे, कारंडेवाडी येथील भक्तगणांनी केले आहे.

 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत