गुरुपौर्णिमेनिमित्त कोळे मठात विविध कार्यक्रमाचे आयोजन...
श्री गुरुनिर्वाण रुद्र पशुपती कोळेकर महास्वामीजी तिसावे पिठाधिपती यांच्या आशीर्वादाने व श्री गुरुनिर्वाण रुद्र पशुपती कोळेकर महास्वामीजी 31 वे पिठाधिपती यांच्या मार्गदर्शनाखाली गुरुपौर्णिमेनिमित्त कोळे ता. सांगोला मठात गुरुवार दिनांक 3 जुलै ते गुरुवार दिनांक 10 जुलै अखेर अखंड शिवनाम सप्ताह, परम रहस्य ग्रंथाचे पारायण, गुरु दीक्षाविधी सोहळा, प्रवचन, किर्तन, भजन, शिवपाठ इ. विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
सप्ताहात सकाळी साडेआठ वाजता परम रहस्य ग्रंथाचे पारायण, दुपारी बारा ते दोन महाप्रसाद, दुपारी दोन ते चार महिला भजनी मंडळाचे भजन, सायंकाळी साडेचार ते साडे सहा शिवपाठ, सायंकाळी साडेसहा ते साडेआठ शिव कीर्तन व महाप्रसाद वाटप होईल. दिनांक 3 जुलै रोजी शिवभक्त सौ जयश्री शीलवंत कोळे यांचे कीर्तन तर गुरुकृपा महिला भजनी मंडळ कोळे यांचे भजन, दिनांक 4 जुलै रोजी शिवभक्त छगन महाराज कदम सांगवी यांचे कीर्तन तर वीरभद्र महिला भजनी मंडळ नाझरे यांचे भजन, दिनांक पाच जुलै रोजी शिवभक्त हनुमंत महाराज कोरे यांचे कीर्तन तर वीरशैव महिला भजनी मंडळ आटपाडी यांचे भजन, दिनांक सहा जुलै रोजी शिवभक्त रामहरी महाराज खंडागळे यांचे कीर्तन तर बसवेश्वर महिला भजनी मंडळ सांगोला यांचे भजन, दिनांक सात जुलै रोजी शिवभक्त भाग्यश्री ताई पाटील यांचे कीर्तन तर सोमनाथ महिला भजनी मंडळ हातीद यांचे भजन, दिनांक आठ जुलै रोजी शिवभक्त राजेश्वर स्वामी यांचे कीर्तन तर वीरभद्र महिला भजनी मंडळ नाझरे यांचे भजन, दिनांक नऊ जुलै रोजी शिवभक्त विवेकानंद स्वामी यांचे प्रसादाचे कीर्तन व मस्तान भजनी मंडळ माचनूर यांचे भजन होईल.
गुरुवार दिनांक 10 जुलै रोजी गुरुपौर्णिमेनिमित्त श्री श्री श्री 108 गुरुनिर्वाण रुद्र पशुपती कोळेकर महास्वामीजी 31 वे पिठाधिपती यांच्या भव्य सानिध्यात दीक्षाविधी सोहळा संपन्न होत आहे. तसेच यावर्षीचा महाप्रसाद मंदाकिनी विलास शिवपुजे यांचा होणार आहे तरी शिवभक्तांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन गुरुपौर्णिमा उत्सव कमिटी, वीरशैव तरुण मंडळ व ग्रामस्थ कोळे यांनी केले आहे.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत