Breaking News

सुसंस्काराची जपणूक करा... - कोळेकर महास्वामी जी


 

नाझरे प्रतिनिधी 

      सध्या सर्वत्र भ्रष्टाचार हा शिष्टाचार झाला असून तो प्रत्येकाच्या मानगुटीवर बसला आहे यासाठी आई-वडिलांनी आपल्या मुलावर स्वसंस्काराची जपणूक करणे गरजेचे आहे व प्रत्येकाने सुसंस्काराची शिदोरी घेऊन वाटचाल केल्यास अनेक संकटांना तोंड देता येते असे गुरुनिर्वाण रुद्र पशुपती कोळेकर महास्वामी जी 31 वे पिठाधिपती यांनी कोळेमठात आशीर्वाचनात सांगितले. 


 प्रत्येकाने आपल्या मुलांना सुसंस्कार देणे गरजेचे आहे व यासाठी आपण आई-वडिलांनी सुसंस्कार राहणे ही गरजेचे आहे असेही महास्वामिनी सांगितले. सुरवातीस गणेश शेटे यांनी महास्वामींचे स्वागत केले तर सुनील शेटे व सौ. शुभांगी शेटे या दाम्पत्याच्या हस्ते महाआरती संपन्न झाली. तसेच शिवपाठ, व भाग्यश्री ताई पाटील यांचे कीर्तन संपन्न झाले, त्यानंतर महाप्रसाद वाटप करण्यात आला.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत