Breaking News

राज्यातील जिल्हा परिषद सेवानिवृत्त शिक्षकाची २८ जुलैला पुण्यातील शिक्षक भवनात सभा


सांगोला प्रतिनिधी

                 महाराष्ट्र राज्यातील जिल्हा परिषद सेवानिवृत्त शिक्षक संघनेची बैठक विविध प्रश्नावर चर्चा करण्यासाठी सोमवार दिनांक २८ जुलैला सकाळी ११ वाजता शिक्षक भवन १९२ नवी पेठ, गांजवे चौक पत्रकार भवन शेजारी पुणे येथे आयोजित केली असल्याचे पत्रक राज्य अध्यक्ष शिवानंद भरले यांनी प्रसिध्दीस दिली आहे

       या बैठकीत पेन्शन विक्री समायोजन ११ वर्षानी करावेत, अश्वासीत प्रगती योजनेचा लाभ, वयाच्या ७० वर्षापासून १०℅ पेन्शन वाढ, पदवीधर सेवानिवृत्त शिक्षकांना पुर्वलक्षीप्रभावानी काल्पनिक वेतनवाढीचा लाभ, २०२० च्या सामान्य प्रशासनाने काढलेल्या पत्रा प्रमाने सेवानिवृत्तीनंतर अति प्रधान वसूली थाबंवावें ३० जूनला सेवशिक्षकाना पुर्वलक्षीप्रभावानी जुलैला वेतनवाढ देऊन सुधारीत पेन्शन २०१६ पासून द्यावी या प्रश्नावर चर्चा करण्यात येणार आहे तसेच राज्य व जिल्हा स्तरावर पदाधिकारी पुर्नरचना करण्यात येणार आहे तरी सर्व जिल्ह्यातील सेवानिवृत्त शिक्षक बहुसंख्येनी हजर राहावे असे आवाहन सरचिटणीस रामराव वराड, गोपाळ आगरवाल, हरिभाऊ निसरडी, प्रभाकर डहाके यांनी अवकाश केले आहेत

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत