पायोनियर इंग्लिश मिडीयम स्कूल य.मंगेवाडी येथे गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी
सांगोला गौरव न्यूज नेटवर्क:
पायोनियर इंग्लिश, सेमी इंग्लिश मिडीयम स्कूल य.मंगेवाडी मध्ये गुरुपौर्णिमेचा पवित्र सोहळा भक्तिभावाने आणि उत्साहात साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने झाली. सर्व विद्यार्थ्यांनी शिक्षकांना नमस्कार करून आदर व्यक्त केला.
संस्थापक अध्यक्ष अनिल येलपले सर यांनी गुरुपौर्णिमा सणाचे महत्त्व पटवून देऊन विद्यार्थ्यांनी गुरूंचा आदर राखला पाहिजे असे सांगितले .तसेच आशुतोष रूपनर सर आणि राऊत मॅडम यांनी देखील विद्यार्थ्यांना गुरुपौर्णिमा विषयी मोलाचे मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन आशुतोष रूपनर सर यांनी सुरेखपणे पार पाडले, तर आभारप्रदर्शन बाबर सर यांनी केले.
संपूर्ण कार्यक्रमात गुरूंच्या कार्याबद्दल आदर, कृतज्ञता आणि संस्कार यांचा संगम पाहायला मिळाला.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत