Breaking News

अजनाळे येथे उद्या एस. के एंटरप्राईजेस उद्घाटन सोहळा




अजनाळे :सचिन धांडोरे:

अजनाळे (ता. सांगोला, जि. सोलापूर): अजनाळे गावात 'एस. के. एंटरप्रायझेस' या नव्या उद्योगाचा भव्य उद्घाटन समारंभ शुक्रवार, दिनांक १८ जुलै २०२५ रोजी सकाळी ९ वाजता आयोजित करण्यात आला आहे.


या ठिकाणी सर्व नामवंत कंपन्यांची औषधे, बियाणे, विद्राव्य खते आणि शेती उपयोगी जैविक कीटकनाशके उपलब्ध असणार आहेत. शेतकऱ्यांसाठी ही सुविधा एक महत्वपूर्ण पाऊल ठरणार आहे.

या समारंभास प्रो. उत्तम लोकरे व प्रो. प्रकाश येलपले यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजन करण्यात आले असून, ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

स्थळ: एस. के. एंटरप्रायझेस, अजनाळे, ता. सांगोला, जि. सोलापूर.




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत