Breaking News

पर्यावरणाचा ऱ्हास थांबविण्यासाठी वृक्ष लागवड गरजेची.. आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख..! बंडगर वाडी पाटील ते बंडगर वाडी चिक महूद येथे वृक्षारोपण संपन्न... !!


 सांगोला प्रतिनिधी 

       पर्यावरणाचा ह्रास थांबविण्यासाठी बंडगरवाडी गावाने व अण्णासो पाटील यांनी जो 500 झाडे लावण्याचा उपक्रम सुरू केला तो कौतुकास्पद असून, ज्याप्रमाणे झाडे लावता त्याप्रमाणे त्याची काळजी ही घ्या तसेच आबासाहेब यांची जयंती व पुण्यतिथीचे औचित्य साधून आपण प्रत्येक गावातील वय वर्षे 60 मधील महिला व पुरुषांसाठी मोफत अँजिओग्राफी व अंजू प्लास्टिक सर्जरी साठी सर्व खर्च आपण करणार व यासाठी पत्रकारांनी सहकार्य करावे व यामध्ये आपण पक्षभेद व जातीभेद राहणार नाही असे मत आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख यांनी बंडगर वाडी पाटी ते बंडगर वाडी गाव येथे भव्य वृक्षारोपण सोहळ्यात मत व्यक्त केले. 

     आज प्रत्येकास ऑक्सिजन गरजेचा असून यासाठी वृक्ष लागवड करा व वृक्षतोड बंद करा असे मत वनक्षेत्रपाल तुकाराम जाधवर यांनी याप्रसंगी मत व्यक्त केले.

    आमदारकीच्या निवडणुकीत बंडगर वाडी चिक महूद येथे डॉक्टर बाबासाहेब यांना 480 मते पडली व त्याप्रमाणे आम्ही 500 झाडे लावण्याचा संकल्प केला असून, दोन वर्षे प्रत्येकी 20 रोपे एका कुटुंबाने योग्य जोपासल्यास यामधून विजेत्यास प्रत्येकी प्रथम बक्षीस पन्नास हजार, द्वितीय पंचवीस हजार तर तृतीय दहा हजार दिले जाईल.

      मा. अण्णासो पाटील..

      सदर प्रसंगी जि प गट नेते बाळासाहेब पाटील, खिलारवाडी सरपंच संजय गोडसे, सरपंच निवृत्ती बंडगर, प्रसिद्धीप्रमुख चंद्रकांत सरतापे, अनिल बंडगर, बाबासो वाघमोडे, अण्णा तांबवे, राहुल बंडगर, भाई राजेंद्र देशमुख, पट्टे बापूराव बंडगर, जयवंत बंडगर, बंडगर वाडी ग्रामस्थ, युवक वर्ग, वृक्षप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते. शेवटी सर्वांचे आभार अण्णासो पाटील यांनी मानले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत