डॉ सुधीर ढोबळे यांचे कडून बापूसाहेब ठोकळे यांच्या वाढदिवसानिमित्त शालेय साहित्यांची भेट
सांगोला तालुक्यातील बहुजन नेते बापूसाहेब ठोकळे यांच्या वाढदिवसानिमित्त एक आगळावेगळा उपक्रम राबवण्यात आला. पारंपरिकरित्या वाढदिवस साजरा करण्याऐवजी, गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करून सामाजिक भान जोपासणारा आदर्श घालून देण्यात आला. या उपक्रमाचा भाग म्हणून संजीवनी हॉस्पिटलचे सर्वेसर्वा डॉ. सुधीर ढोबळे यांनीही या उपक्रमास संमती दर्शवली
बापूसाहेब ठोकळे यांनी काही दिवसांपूर्वी सोशल मीडिया, प्रिंट मीडिया आणि डिजिटल मीडियाच्या माध्यमातून जनतेस आवाहन केले होते की, "माझ्या वाढदिवसानिमित्त शाल, फेटा, हार-तुरे, केक इत्यादींवर खर्च न करता, शालेय साहित्य वह्या, पुस्तके, पेन या स्वरूपात भेट द्यावी, जेणेकरून सांगोला तालुक्यातील गोरगरीब, दिन-दलित, मागासवर्गीय विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत होईल." त्याच्या या प्रेरणादायी आवाहनाला प्रतिसाद देत डॉ. सुधीर ढोबळे यांनी विद्यार्थ्यांच्या मदतीसाठी शालेय साहित्याचे वाटप करण्याचा निर्णय घेतला.
बुधवार, २५ जून रोजी संजीवनी हॉस्पिटल सांगोला येथे बापूसाहेब ठोकळे आणि त्यांचा मित्रपरिवार यांना निमंत्रित केले. यावेळी डॉ. सुधीर ढोबळे यांनी स्वतः त्यांना शालेय साहित्य सुपूर्त करून सन्मानित केले. कार्यक्रमाला विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती लाभली होती. त्यामध्ये महाराष्ट्र राज्य मसनजोगी समाज राज्याध्यक्ष लक्ष्मण घनसरवाड ,डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटना सांगोला तालुका अध्यक्ष पत्रकार दीपक ऐवळे, पत्रकार समाधान धांडोरे, गौडवाडी माजी उप सरपंच राजाभाऊ गुळीग, उद्योजक समाधान जावीर, माजी पोलीस उपनिरीक्षक होवाळसाहेब, कोकरे सर, समीर शेख, रोहन शिंदे तसेच संजीवनी हॉस्पिटलचा सर्व स्टाफ उपस्थित होता.
या प्रसंगी बापूसाहेब ठोकळे यांनी आपले मनोगत व्यक्त करत डॉ. ढोबळे यांच्या कार्याचे कौतुक केले. “आपल्या भागात एन्डोस्कोपी, गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया, लेझर उपचार अशा अद्ययावत वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देत गोरगरीब जनतेची सेवा करण्याचे व्रत डॉ. ढोबळे यांनी घेतले आहे, हे निश्चितच प्रेरणादायी आहे,” असे त्यांनी सांगितले. यापुढेही त्यांच्या हातून अशीच जनसेवा घडावी, अशी सदिच्छा त्यांनी व्यक्त केली.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन पत्रकार दीपक ऐवळे यांनी केले. सामाजिक बांधिलकीचा उत्कृष्ट प्रत्यय देणारा हा उपक्रम परिसरातील नागरिकांच्या मनात विशेष स्थान निर्माण करून गेला.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत