Breaking News

रविराज शेटे यांचे कडून वीरशैव समाजाचे प्रश्न मार्गी लागावेत ‐प्रा.झपके


 
सांगोला प्रतिनिधी

          भारतातील विशेशतः महाराष्ट्रातील लिंगायत समाज हा वीरशैव की हिंदु अशा गोंधळलेल्या स्थितीत असुन या समाजाच्या अनेक संघटना महाराष्ट्रात कार्यरत आहेत...सर्वांचा एकच ऊद्देश असुन वीरशैव हा स्वतंत्र धर्म असावा,अशी मागणी आहे..म.बसवेश्वर यांच्या विचारावर श्रद्धा असणार्या सर्व लिंगायत बांधवानी एकत्र येऊन वीरशैव धर्मासाठी एकत्र यावे...या साठी नूतन तालुकाध्यक्ष रविराज शेटे यानी पुढाकार घ्यावी,संघटना बळकट करावी,त्या साठी सर्वतोपरी पाठीशी राहण्याचे अभिवचन प्रा.प्रबुद्धचंद्र झपके यानी केले...महाराष्ट्र लिंगायत महासभा सांगोला तालुका अध्यक्ष पदी सांगोला विद्यामंदिर परिवारातील सेवानिवृत्त लिपिक रविराज शेटे यांची निवड झाली आहे..त्याब्द्द्ल सांगोला विद्यामंदिर रिटायर्ड  ग्रुपचे प्रमुख प्रा.राजेंद्र ठोंबरे यानी शेटे यांच्या सत्काराचे आयोजन केले होते...त्या वेळी प्रा.झपके बोलत होते...या प्रसंगी रिटायर्ड ग्रुपचे वतीने शेटे यांचा झपके सर यांचे हस्ते सत्कार करण्यात आला..तसेच ह.द.माळी यानी माळी परिवारा तर्फे सत्कार केला..रविराज शेटे यानी कै.गुरुवर्य बापुसाहेबांचया आशीर्वादाने व झपके परिवाराच्या स्नेहाने यश मिळाल्यचे सांगितले..समाज कार्याची व पत्रकारितेची आवड असल्याने दहा वर्षे अगोदरच स्वेच्छानिवृत्ती  घेतल्याचे सांगून सत्कारा ब्द्द्ल कृतज्ञता व्यक्त केली...भीमाशंकर पैलवान यानी आभार मानले..या वेळी संस्था सचिव म.शं.घोंगडे,प्रा तायाप्पा आदट,सेवानिवृत्त प्राचार्य सुभाष महिमकर,नारायण विसापुरे,रावसाहेब माने,अमर गुळमिरे भाऊसाहेब पवार,पांडुरंग बनकर ,अरविंद डोंबे गुरुजी,संजय खिस्ते, रुद्र पाटणे आदि उपस्थित होते..

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत