Breaking News

पायोनियर गुरुकुल य.मंगेवाडी मध्ये महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहात साजरी

सांगोला गौरव न्यूज नेटवर्क

      खंडोबा बहुद्देशीय संस्था संचलित पायोनियर निवासी गुरुकुल मध्ये भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्सवात साजरी झाली. या कार्यक्रमासाठी  यलमार मंगेवाडी गावचे मा.सरपंच श्री.दत्तात्रय मासाळ साहेब प्रमुख पाहुणे म्हणून लाभले होते.तसेच या कार्यक्रमासाठी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष माननीय श्री. अनिल येलपले सर यांनी अध्यक्ष स्थान भूषवले. कार्यक्रमाची सुरुवात स्वागत व डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमा पूजनाने झाली. यावेळेस गुरुकुल मधील अनेक विद्यार्थी व विद्यार्थिनींनी  आपले मनोगत व्यक्त केले.  इयत्ता आठवी मधील विद्यार्थीनी माया सुधाकर चव्हाण व इयत्ता दहावी मधील निधीशा संभाजी बाबर यांनी उत्कृष्ट गीते सादर केली. तसेच गुरुकुल मधील गणित विषयाचे प्राध्यापक अजित रणदिवे सर व प्रसाद कडवं सर यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. यानंतर गुरुकुल चे प्राचार्य डॉ. अमोल जयवंत रणदिवे यांनी आपल्या प्रबोधनातून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याचा आढावा घेतला.तसेच संस्थापक अध्यक्ष श्री. अनिल येलपले सर यांनी बहुमोलाचे मार्गदर्शन केले . या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले माजी सरपंच मासाळ साहेब यांनी बाबासाहेब आंबेडकरांविषयी माहिती सांगितली.  हा कार्यक्रम यशस्वी रित्या पर पडण्यासाठी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष अनिल येलपले सर व गुरुकुल चे प्राचार्य डॉ. अमोल रणदिवे सर यांचे मार्गदर्शन लाभले.

        गुरुकुल मधील प्रत्येक कार्यक्रम सुंदर व्हावा म्हणून त्या कार्यक्रमाची सजावट करून शोभा वाढवणारे स्पोर्ट विभाग प्रमुख माळी सर व आदलिंगे सर यांनीही उत्तम कामगिरी पार पाडली. कार्यक्रमाचे  सूत्रसंचालन सौं.पुजा होटे मॅडम यांनी केले . अशा छान वातावरणात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती पायोनियर गुरुकुल मध्ये मोठ्या थाटामाटात साजरी झाली. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन सौ. ज्योती रणदिवे मॅडम यांनी केले. हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे सहकार्य लाभले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत