Breaking News

सांगोला तालुक्यातील अवैधरित्या चालणाऱ्या वीट भट्टया मुळे नागरिकांच्या आरोग्यावर व फळबागाचे नुकसान होत असल्यामुळे बंद कराव्या - सामाजिक कार्यकर्ते रोहित सुर्यागण

 


सांगोला /प्रतिनिधी :
   सांगोला तहसील कार्यालयाकडून एकही विटभट्टीला परवानगी नसतानाही सध्या सांगोला तालुक्यात वीट भट्ट्या सुरु आहेत. प्रदूषण नियंत्रक विभागाकडून नाहरकत प्रमाणपत्र कोणीच घेतलेले नाही. यामुळे शहर व तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याचा व पर्यावरणाचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. शहर व परिसरात वीट पारंपारिक पद्धतीने बनवले जाते. व दगडी कोळशाचे यामध्ये इंधन म्हणून उपयोग  करण्यात येतो. प्रदूषण नियंत्रक मंडळानुसार इंधन म्हणून वापरात येणाऱ्या दगडी कोळशाच्या जन्मानंतर सल्फर डायऑक्साइड कार्बन डाय-ऑक्साइड कार्बन मोना ऑक्साईड, आणि नायट्रोजन मधील ऑक्साईड या विशारी वायूंचे उत्सर्जन होते. त्यामुळे डोळ्यांचे विविध विकार आणि हवेतील नायट्रोजन मधील डाय-ऑक्साइडमुळे फुफुसाचे व त्वचेचे आजार होतात. तसेच कार्बन मोना ऑक्साईड आणि कार्बन डाय-ऑक्साइड या विषयावर वायूमुळे वीट भट्ट्यांच्या परिसरातील तापमानात वाढ होऊन  सभोवतालच्या शेतीवर तसेच नागरिकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होतात या सर्व कारणांमुळे प्रदूषक नियंत्रक मंडळांनी वीटभट्टी सुरू करण्यासंदर्भातील नियम सक्तीचे केलेले आहेत. परिणामी ज्यादा दर वीट भट्टी चालक प्रदूषण नियंत्रक मंडळाची कुठलीही परवानगी न घेता वीटभट्ट सुरू करतात सध्या सांगोला तालुक्यात अवैध विट भट्ट्या सुरू आहेत. यामुळे सांगोला तालुक्यातील  वीट भट्टी यांच्या परिसरातील शेतीवर नागरिकांच्या आरोग्यावर व पर्यावरणावर मोठा विपरीत परिणाम होताना दिसून येत आहे.तसेच विटभट्ट्यावर नियमानुसार असणाऱ्या चिमण्यादेखील  दिसून येत नाहीत.
    वीट भट्टीवर काम करणारे विविध श्रेणीतील कामगारांमध्ये राखेचे सामान उतरवणारे कामगार आणि राख हातळणारे कामगार हे प्रदूषकांच्या संपर्कात सर्वात जास्त येतात. या प्रदूषकांच्या श्वासोश्वासामुळे त्वचा आणि डोळ्यांना जळजळ होते. आणि फुफुसाचे आजार जसे की न्यूमोनिकोसिस आणि सिलिकॉसिस होऊ शकतात जे सिलीसीयस धूळ श्वासोश्वासामुळे होतात. प्रदूषणाचा परिणाम कृषी पिकांवर आणि फळबागांवरही होतो वीटभट्ट्यांमधून येणाऱ्या प्रदूषकांमुळे आंबा आणि इतर फळबागांनाही होणारे नुकसान सर्वज्ञात आहे. त्यामुळे तात्काळ अवैध रित्या चालणाऱ्या विटभट्ट्या बंद करून वितभट्टीचालकावर दंड आकारून योग्य ती चौकशी करून कायदेशीर कारवाई करण्यात यावी अन्यथा सांगोला  तहसील कार्यालयासमोर बेमुदत आंदोलन करण्यात येईल असे निवेदनात रोहित सुर्यागण सामाजिक कार्यकर्ते तथा संपादक दै.धाडस एक्सप्रेस यांनी नमूद केले आहे. तसेच माहितीसाठी प्रत, महसूल मंत्री, मंत्रालय मुंबई. मुख्यमंत्री, महा राज्य मंत्रालय मुंबई, उपमुख्यमंत्री महा राज्य, मंत्रालय मुंबई,आरोग्य मंत्री महा. राज्य मंत्रालय मुंबई, जिल्हाधिकारी सो,जिल्हाधिकारी कार्यालय सोलापूर, प्रदूषण नियंत्रक कार्यालय सोलापूर, पोलिस अधीक्षक सो, कार्यालय सोलापूर,प्रांताधिकारी कार्यालय मंगळवेढा यांनाहि निवेदन पाठवण्यात  आले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत