Breaking News

अल्पसंख्यांक समाजाच्या विकासासाठी योजनांची प्रभावी अंमलबजावणी करा - अल्पसंख्यांक विकास मंत्री दत्तात्रय भरणे.


 श


प्रतिनिधी - संतोष कदम.

वालचंदनगर :- आज मंत्रालयातील दालनात अल्पसंख्यांक मंत्री दत्तात्रय भरणे यांनीअल्पसंख्याक विकास विभागाच्या आढावा बैठकीचे आयोजन केले होते. यावेळी सचिव रुचेस जयवंशी, सहसचिव मोईन तशिलदार , वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

मंत्री भरणे म्हणाले,राज्यातील अल्पसंख्याक समाजाचा सामाजिक,शैक्षणिक,आर्थिक विकास करण्यासाठी शासनाकडून विविध योजना राबविल्या जातात. या योजनांची प्रभावी अमंलबजावणी करावी,नाविन्यपूर्ण योजनांच्या माध्यमातून लोकाभिमुख उपक्रम राबवावेत अशा सूचना मंत्री भरणे यांनी संबधीत अधिकाऱ्यांना दिल्या.

      पुढे ते म्हणाले, अल्पसंख्याक समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न करणार असून त्यांच्या सर्वांगिण प्रगतीसाठी कटिबद्ध आहे. अल्पसंख्याक विद्यार्थ्यांकरिता शिष्यवृत्ती योजना, मौलाना आझाद अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळाचा निधी वाढविण्यासाठी पाठपुरावा करणे, स्वयंसहायता बचतगट योजना महत्वपूर्ण आहेत. या विभागाच्या योजना समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवा, अशी सूचनाही त्यांनी अधिकाऱ्यांना केली.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत