अजनाळे: सचिन धांडोरे: तुझं कसं चाललंय....मुलं काय करताता....मुलांच शिक्षण काय म्हणतयं अशी ख्याली खुशाली विचारण्यापासून अगं कुठं असतेस..... किती वर्षांनी भेटतोय......कसे आहेत सगळे....अशा आपुलकीच्या प्रश्नापर्यंतचे संवाद आणि शालेय जीवनातील मर्मबंधातील आठवणींना उजाळा देण्यापासून अशी सामाजिक जाणीव समृद्ध करण्याच्या चर्चा सांगोल्यातील सुप्रसिद्ध हॉटेल फाईव्ह स्टार मध्ये रंगल्या.... निमित्त होते विकास विद्यालय अजनाळे येथील इ दहावी २००८ बँच मधील विद्यार्थी --विद्यार्थिनींचा दिवाळी स्नेहमेळावा सोमवार दि ४ नोव्हेंबर २०२४ रोजी आयोजित करण्यात आला होता.
तब्बल १६ वर्षानंतर आपल्या सर्व जुन्या मित्र- मैत्रिणी यांची भेट होणार असल्याने सकाळपासूनच त्याची चाहूल पहावयास मिळाली पहिली ते दहावीपर्यंत शिक्षण घेतलेल्या अनेक वर्षांनी झालेल्या गाठीभेटीने प्रत्येकाच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता. जुन्या आठवणींच्या चर्चा गप्पा, खोड्या, किस्से व हास्य कल्लोळाने हा मेळावा उत्तरोत्तर रंगला होता. आपल्या जुन्या मित्र मैत्रिणीची भेट झाल्याने एक वेगळा आनंद सारे जण अनुभवत होते अनेक जण ऋणानुबंध जपत भूतकाळात रमले होते आपले मनोगत व्यक्त करताना विद्यार्थी व विद्यार्थिनींनी आपल्या विद्यालयीन जीवनातील जुन्या आठवणी ताज्या केल्या.२००८ बँच मधील विद्यार्थी क्लासवन अधिकारी, सरपंच, उपसरपंच, पत्रकार ,उद्योगपती , व्यापारी, गृहिणी यासारख्या वेगवेगळ्या पदावर कार्यरत असल्यामुळे सर्वांकडून या बॅचचे कौतुक केले जात होते.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार सचिन येलपले यांनी केले या कार्यक्रमाला विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने हजर होते.या कार्यक्रमाचे देखणं असं नियोजन अतुल येलपले यांनी केले होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा