Breaking News

फुले प्रहार सामाजिक संस्था आयोजित माळी वधू-वर मेळाव्यात १८५ वधू-वरांची नाव नोंदणी. * मेळाव्यास वधू-वरांचा उस्फुर्त प्रतिसाद.


 इंदापूर :-   फुले प्रहार सामाजिक संस्था इंदापूर आयोजित माळी समाज वधू- वर व पालक परिचय मेळाव्यास विवाह इच्छुक नव वधू-वर,विधवा,घटस्फोटीत,विधूर यांनी उस्फुर्त प्रतिसाद देत माळी समाजातील १८५ विवाह इच्छुक नव वधू-वर यांनी मोफत नाव नोंदणी करून आपला सहभाग नोंदवीला असल्याची माहिती फुले प्रहार सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष सुधाकर बोराटे,उपाध्यक्ष बाबासाहेब भोंग,कार्याध्यक्ष अशोक देवकर यांनी दीली.

    शहा सांस्कृतिक भवन इंदापूर येथे रविवारी फुले प्रहार सामाजिक संस्थेच्या वतीने सलग दुसर्‍या वर्षी विनाशुल्क वधू-वर व पालक परिचय मेळाव्याचे

आयोजन करण्यात आले होते.मेळाव्याचे उदघाटन इंदापूर कृषि उत्पन्न बाजार समितीचे संचालक गणेश झगडे,पंचायत समितीचे माजी सदस्य निवृत्ती गायकवाड,भाजपा पंचायतराज ग्राम विकास विभाग पश्चिंम महाराष्ट्र संयोजक युवराज मस्के,ब्रम्हदेव दूधाळ एड.नितिन राजगुरू, एड.सचिन राऊत,बाजार समिती संचालक चंद्रकांत बोराटे यांचे हस्ते दिपप्रज्वलन करून उदघाटन करण्यात आले. इंदापूर,बारामती,दौंड,शिरूर,माढा,मोहळ,पंढरपूर,

बार्शी,माळशिरस,पंढरपूर,सांगोला,माण,फलटण,हवेलीपुरंदर,वाई तालुक्यासह इतर अनेक भागातुन विवाह इच्छुक वधू-वर उपस्थित राहीले.व नावनोंदणी करून आपला परिचय दीला.यावेळी वधू-वरां सोबत त्यांचे पालक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.संस्थेच्या वतीने मेळाव्यास उपस्थित वधू-वर, पालक, नातेवाईक व सर्वांसाठी मोफत स्नेहभोजनाची सोय करण्यात आली होती.मेळाव्यात मान्यवरांचे सत्कारासाठी हार फुले यांचा वापर न करता पिंक तैवान पेरूची रोपे देवुन सत्कार करण्यात आला.

        याप्रसंगी जय इंन्स्टिट्युट व नर्सिंग होम अध्यक्ष जयंत नायकुडे, लहुजी शक्ति सेना पुणे जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ जगताप,एड.श्रीकांत करे,माधवी बनसुडे,

गणेश भुजबळ,जैन संघटना अध्यक्ष धरमचंद लोढा, बाळासाहेब क्षिरसागर,माळी महासंघ पुणे जिल्हाध्यक्ष विकास शिंदे,शिवशंभो दहीहंडी संघाचे अध्यक्ष शुभम पवार,प्रगतशिल बागायतदार शिवाजी सातव,पत्रकार गणेश कांबळे,पत्रकार सलीम शेख,पत्रकार बापू बोराटे यांचेसह मोठ्या संखेने समाजबांधव उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रस्ताविक ॲड.नितीन राजगुरू यांनी केले तर सुत्रसंचलन शिवाजी दौलतोडे यांनी केले.आभार अशोक देवकर यांनी मानले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत