Breaking News

नागपंचमी महोत्सवाच्या बरोबरच शिवस्वराज्य यात्रेचे स्वागत जिजामाता प्रांगणात आप्पासाहेब जगदाळे यांनी केले.


 विशेष प्रतिनिधी - संतोष कदम.     

इंदापूर :-  इंदापूर तालुक्यातील सराटी येथे भव्य नागपंचमी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते.तसेच शिवस्वराज्य  यात्रेचे स्वागतही करण्यात आले. या भव्य नागपंचमी महोत्सवामध्ये  महिलांसाठी विविध प्रकारच्या स्पर्धा ठेवण्यात आल्या होत्या. जिंकून आलेल्या महिलांना पैठणीचे  बक्षीस वाटप ही करण्यात आले. त्याचप्रमाणे उपस्थित असणाऱ्या लोकांसाठी खाऊचे, वस्तूंचे  स्टॉल होते.

      या भव्य नागपंचमी महोत्सवाचे उद्घाटन हे सकाळी 10.30 वाजता माजी उपमुख्यमंत्री  विजयसिंह मोहिते पाटील यांच्या शुभहस्ते करण्यात आले. त्याच्यानंतर ऋतुराज काळे यांचा सायकल शो संपन्न झाला.

     दुपारी शिवस्वराज्य शिव यात्रेचे स्वागत करण्यात आले. संसदरत्न सुप्रिया ताई सुळे या कार्यक्रमाच्या अध्यक्षा  होत्या. जयंत पाटील, खासदार अमोल कोल्हे, महारुद्र पाटील, सागर बाबा मिसाळ तसेच इंदापूर तालुक्यातील दिग्गज नेते, अंगणवाडी सेविका व मदतनीस, बूथ कमिटी कार्यकर्ते  उपस्थित होते.

        या कार्यक्रमांमध्ये इंदापूर तालुक्याला आमदारकीसाठी नवीन चेहरा हा आप्पासाहेब जगदाळे यांच्या रूपाने इंदापूर तालुक्याला मिळावा अशी कार्यकर्त्यांची आग्रही मागणी होती. सत्तेत नसतानाही आप्पासाहेब जगदाळे यांनी जनतेची सेवा ही केलेली आहे. आप्पासाहेब जगदाळे यांनी गेले वीस- पंचवीस वर्षे झाले इंदापूर तालुक्यातील जनतेची सेवा ही केलेली आहे. यावेळेस  आमदारकी आप्पासाहेब जगदाळे यांना मिळावी अशी इंदापूर तालुक्यातील कार्यकर्त्यांची इच्छा आहे. इंदापूर तालुक्यातील गोरगरीब, दीनदलित  लोकांना आप्पासाहेब जगदाळे म्हणजे आपला हक्काचा माणूस आहे.

       इंदापूर तालुक्यातील आजी आणि माजी आमदारांना आप्पासाहेब जगदाळे यांनी आत्तापर्यंत मोलाचे सहकार्य केले आहे. आत्ता जर आप्पासाहेब आमदारकीसाठी उभे राहिले तर  त्यांना मदत केली पाहिजे आणि इंदापूर तालुक्यासाठी नवीन चेहऱ्याला संधी दिली पाहिजे अशी कार्यकर्त्यांची मागणी आहे. आप्पासाहेब म्हणाले की  आदरणीय पवार साहेब आणि आदरणीय सुप्रियाताई सुळे यांनी जर संधी दिली तर आपण पूर्ण ताकतीनिशी  उतरून जिंकूनच दाखवू. 

       कार्यक्रमाच्या शेवटी सर्व दिगजांची भाषणे झाली  आणि कार्यक्रमाची सांगता आनंदी आणि उत्साही वातावरणात झाली.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत